जान्हवी लाड यांचे एम बी बी एस परीक्षेत उल्लेखनीय यश.
ब्यूरो न्यूज | : मालवण तालुक्यातील जान्हवी लाड यांनी एम बी बी एस परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. जान्हवी लाड ह्या मालवण तालुक्यातील पराड येथील सामाजिक कार्यकर्ते विष्णू लाड व बॅ नाथ पै सेवांगण च्या कार्यवाह, खरारे पेंडूर गावच्या ग्रा.पं. सदस्या वैष्णवी लाड यांच्या कन्या आहेत.
सामाजिक कार्यकर्ते दीपक भोगटे तसेच बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, संस्था आणि सर्व स्तरातून जान्हवी लाड व त्यांचे पालक यांची प्रशंसा केली जात असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)