ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
मालवणात रंगभरण व वेशभूषा स्पर्धा उत्साहात.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवणात रंगभरण व वेशभूषा स्पर्धा उत्साहात.

प्रकाशन: 01 Apr 2025 12:14 AM
वाचन संख्या 104

हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीचे आयोजन.

मालवण | ब्यूरो न्यूज : मालवणात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रंगभरण तसेच वेशभूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दोन्ही स्पर्धेतील विजेत्यांना काल हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनंतर रात्री मालवण नगरपालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृह परिसरात मान्यवरांच्या उपस्थितीत रोख रक्कम व सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या रंगभरण स्पर्धेत शहर परिसरातील विविध शाळांमधून सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर वेशभूषा स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – रंगभरण स्पर्धा इयत्ता पहिली ते चौथी अनुक्रमे – हर्षद उपेंद्र पाटणकर (जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल), हर्षदा गौरव सावबा (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धुरीवाडा), अनुज निलेश हिरे (रघुनाथ देसाई विद्यालय), उत्तेजनार्थ प्रथम हिताक्षी संतोष सारंग (अंबाजी विद्यालय वायरी मालवण), द्वितीय भूमी भूषण परसनाईक (भंडारी प्राथमिक शाळा), तृतीय – रेविना लॉईड फर्नांडिस (रोझरी इंग्लिश स्कूल मालवण), चतुर्थ – अवनी सुजित परब (प्राथमिक कन्या शाळा मालवण), पाचवा -गौरी हाकाराम मीना (मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळा). पाचवी ते सातवी अनुक्रमे सानवी सचिन पेडणेकर (रोझरी इंग्लिश मीडियम स्कूल), चिन्मयी अमोल निकम (जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल), रुद्राक्ष सतीश खवणेकर (भंडारी हायस्कूल), उत्तेजनार्थ प्रथम मैथिली मयूर राजापूरकर (टोपीवाला हायस्कूल मालवण), द्वितीय तन्वी ललित मेस्त्री (श्री रेकोबा माध्यमिक विद्यालय वायरी मालवण), तृतीय – धनश्री प्रशांत परब (जिल्हा परिषद रेवतळे शाळा), चतुर्थ – स्वरा शैलेश मालंडकर (रोझरी इंग्लिश स्कूल), पाचवी – वेदा किशोर बिळवसकर (रोझरी इंग्लिश स्कूल)वेशभूषा स्पर्धा – बालगट अनुक्रमे – अभिज्ञा मुणगेकर, स्वर्णिका प्रभू, राहील तायशेटे, इयत्ता तिसरी ते पाचवी सान्वी प्रभू, निहार कोचरेकर, सिया कदम, इयत्ता सहावी ते आठवी – रेवा जोशी, स्वर्णीम काळसेकर, निर्भया जाधव, महिला पुरुष खुला गट – शांती तोंडवळकर, बन्सी पटेल, श्वेता यादव, मोहिनी हडकर, सावित्री पटेल.

विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीचे संस्थापक भाऊ सामंत, संयोजक प्रशांत हिंदळेकर, विजय केनवडेकर, बंटी केनवडेकर, अमित खोत, बबन शिंदे, रत्नाकर कोळंबकर, अरविंद मयेकर, यतीन खोत, शिल्पा खोत, आप्पा लुडबे, विलास हडकर, अनिकेत फाटक, श्रीराज बादेकर यांच्यासह अन्य सदस्य, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स