ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कणकवली तालुक्यातील भरणी गांवात रेशन दुकानाचा आरंभ...!

कणकवली तालुक्यातील भरणी गांवात रेशन दुकानाचा आरंभ...!

प्रकाशन: 27 Oct 2021 10:01 AM
वाचन संख्या 32

शिवसेनेच्या अथक पाठपुराव्याला मिळाले यश….!

ग्रामस्थ व शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून तहसीलदार व पुरवठा अधिकार्यांचा कृतज्ञता सत्कार…..!


कणकवली | उमेश परब (ब्युरो चीफ, सिंधुदुर्ग ): कणकवली तालुक्यातील भरणी गावात रेशन सुरू झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांची होणारी अनेक वर्षांची पायपीट व दगदग आता थांबली आहे.
गावात रेशन दुकान सुरू व्हावे यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून ग्रामस्थांनी शासन दरबारी कित्येक वर्षे पाठपुरवठा केला होता. त्यांच्या पाठपुरव्याला यश आले आहे. गावात रेशन दुकान सुरू झाल्याबद्दल तहसीलदार आर.जे.पवार व व पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांची ग्रामस्थ व शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. भरणी गावात रेशन दुकान नसल्यामुळे येथील रेशनकार्ड देवगड तालुक्यातील शिरगाव व काही महिने तरंदळे येथील रेशन दुकानात जावून धान्य घ्यावे लागत होते. त्यामुळे विनाकारण कार्ड धारकांना नाहक भुर्दंड व मनस्ताप सहन करावा लागत होता. भरणी गांवात रेशन दुकान सुरू व्हावे, अशी ग्रामस्थांनी अनेक वर्षे मागणी होती. ग्रामस्थांनी शिवसेनेच्या माध्यमातून तहसीलदार आर.जे.पवार यांच्याकडे याबाबत पाठपुरवठा केला.
ग्रामस्थांची ही गरज लक्षात घेऊन त्यांनी रेशन दुकान सुरू करण्यात परवानगी दिल्याने गावात रेशन दुकान सुरू झाले आहे. गावात रेशन दुकान सुरू झाल्याबद्दल तहसीलदार आर.जे.पवार यांची ग्रामस्थ व शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी भेट घेऊन आर.जे.पवार, श्री. जाधव, श्रीमती तांबे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश सावंत-पटेल, नगरसेवक कन्हैया पारकर, बीडवाडी सरपंच सुदाम तेली, निसार शेख,विश्वनाथ दळवी, सुरेश साटम, प्रवीण जगताप, रोशन गुरव प्रकाश गुरव, रमेश जगताप, रामचंद्र राणे, भिकाजी गुरव, अनिल बागवे यांच्यासह भरणी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. केशरी कार्डधारक व अल्पउत्पन्न असलेले लाभार्थी ज्यांना अजून रेशन मिळत नाही. त्यांना रेशन मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली. यावर दिलेल्या इष्टंकामध्ये जी लोक बसतील त्यांना तात्काळ रेशन दिले जाईल व उर्वरित लोकांसाठी वाढीव इष्टान्नकाची मागणी करून त्यांनाही रेशन देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स