वृध्दाश्रमातील रंगपंचमी उत्साहात.
तळेरे | प्रतिनिधी : असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे सेक्रेटरी श्री संदेश शेट्ये व त्यांचे कर्मचारी यांनी केले होते.
यावेळी आश्रमातील आजी आजोबा व कर्मचारी यांनी नृत्य व गाणी सादर करत एकमेकांवर रंगांची उधळण केली आणि अल्पोपहार व भोजनाचा आस्वाद घेतला.
यावेळी श्री समीर मिठबावकर, कु अश्विनी पटकारे, कु सायली तांबे, अस्मि राणे, अमृता इंदप, कु ऋतुजा इंदप, श्री सखाराम कोकरे , सायली इंदप, श्रीम भारती गुरव, सारिका सावंत, सानिया इंदप, अनुजा आचरेकर, मंजिरी राणे, प्रतीक्षा सावंत उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कर्मचारी अस्मि राणे यांनी केला व कार्यक्रमाची सांगता कु अश्विनी पटकारे यांनी केली.
जन्य : निकेत पावसकर
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)