कार्यकर्ता म्हणून काम करायचे असल्यास संपर्क करावा.
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद अध्यक्ष श्रीकांत सावंत यांचा जिल्हा दौरा ; संपर्काचे आवाहन.
प्रतिनिधी : ज्या व्यक्तिंना गावचा, नगर व शहरचा, तालुक्याच्या, जिल्ह्याचा आणि कोकण व देशाचा सर्वांगीण विकास व्हावा असे वाटते तसेच त्यासाठी कार्य करायची तयारी आहे अशा व्यक्तिंनी आपली भेट घ्यावी असे आवाहन रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद व मानवता विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी माध्यमांद्वारे केले आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद अध्यक्ष श्रीकांत सावंत यांचे २३ मार्च रोजी सकाळी ८ वाजता कणकवली येथे आगमन होणार आहे. ते संध्याकाळी ४ वाजता मसुरे येथे येणार असून ग्रामस्थांशी,कार्यकर्त्यांशी चर्चा व विचारविनिमय व मुक्काम करणार आहेत.
सोमवारी सकाळी ८ वाजता ते मालवण शहराला भेट देणार असून ज्यांना कार्यकर्ता म्हणून मनापासून काम करण्याची इच्छा आहे त्यांनी भेटावे आणि अधिक माहितीसाठी 9967050733 / 8459492180 या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क करावा असे आवाहन श्रीकांत सावंत यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)