ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
फिरते कवी संमेलन २०२५.

फिरते कवी संमेलन २०२५.

प्रकाशन: 20 Mar 2025 10:47 PM
वाचन संख्या 102

को. म. सा. प. मालवणचा उपक्रम.

आचरा | ब्यूरो न्यूज : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सावंतवाडी येथे होणार्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर को. म. सा. प. मालवण शाखा, ‘फिरते कवी संमेलन’ होणार आहे. हे कवी संमेलन आचरा ते सावंतवाडी या एस टी बस मधील प्रवासा दरम्यान आयोजीत करण्यात आले आहे. या संमेलनात २० कवी त्यांच्या स्वरचीत तसेच सिंधुदुर्गातील कवी वसंत सावंत, मंगेश पाडगावकर, गंगाधर महांबरे यांच्या कविता सादर करणार आहेत.

फिरत्या कवी संमेलनाची निर्मिती कोकण मराठी साहित्य परिषद मालवणी या शाखेच्या वतीने करण्यात आली आहे. या संमेलनाचे निवेदन रामचंद्र कुबल करणार आहेत तर ध्वनी व्यवस्था सुरेंद्र सकपाळ, नियोजन पांडुरंग कोचरेकर करणार आहेत. या संमेलनाची निर्मिती श्री. सुरेश ठाकूर यांनी केली आहे.

या संमेलनात सुरेश ठाकूर , गुरुनाथ ताम्हणकर, सदानंद कांबळी, पांडुरंग कोचरेकर, श्रुती गोगटे, अर्चना कोदे, रामचंद्र कुबल, सुरेंद्र सकपाळ, विठ्ठल लाकम, सायली परब, संजय परब, महेश चव्हाण, नारायण धुरी, सुगंधा गुरव, मंदार सांबारी, रमाकांत गोविंद शेट्ये, विनोद कदम, अनघा कदम, विनय वझे, वझे आदी कवी सहभाग घेणार आहेत.

कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हास्तरीय संमेलन २२ तारखेला सावंतवाडीत होत आहे. या पार्श्वभूमीवर हे चाकावरती फिरते कवी संमेलन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती मालवणी शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर गुरूजी यांनी दिली

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स