ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
अन्यथा हिंदूंची छत्रपती संभाजी नगरकडे कार सेवेसाठी कूच…!

अन्यथा हिंदूंची छत्रपती संभाजी नगरकडे कार सेवेसाठी कूच…!

प्रकाशन: 18 Mar 2025 04:07 PM
वाचन संख्या 56

औरंगजेबाची कबर हटवण्या बाबत मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात इशारा.

मालवणात विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन.

मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरात विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढत, महाराष्ट्रात असलेली मुघल बादशाह औरंगजेब याची कबर हटविण्यात यावी अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणारे निवेदन तहसीलदार वर्षा झाल्टे व पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांना सादर केले. निवेदन देण्यापूर्वी विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मालवण कुंभारमाठ येथे एकत्र जमत तेथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून घोषणा दिल्या. त्यानंतर कुंभारमाठ येथून देऊळवाडा – भरड ते बाजारपेठ मार्गे फोवकांडा पिंपळ ते तहसीलदार कार्यालय अशी दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व भारत माता यांच्या गौरव सन्मानार्थ व जयकार करत घोषणा देण्यात आल्या. तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून, ‘औरंगजेबची कबर काढून टाकावी’, अशी मागणी करण्यात आली. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावल्या होत्या तसेच मोर्चा दरम्यान पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. श्री विलास हडकर यांनी मोर्चाच्या वतीने निवेदन सादर केले.

यावेळी भाऊ सामंत, श्रीराज बादेकर, विलास हडकर, आपा लुडबे, विजय केनवडेकर, ललित चव्हाण, राजन परुळेकर, अनिकेत फाटक, संदीप बोडवे, ॲड. गवाणकर, भालचंद्र राऊत, केदार झाड, ॲड. गोवेकर, शिल्पा खोत, नंदा सारंग, शांती तोंडवळकर, मानसी घाडीगावकर, गणेश चव्हाण,अविनाश सामंत, समीर शिंदे, दादा वेंगुर्लेकर, अजित गवंडे, आनंद खवणेकर, सुशांत तायशेटे, महेश मांजरेकर, तेजस चव्हाण, प्रसाद हळदणकर, स्वप्निल घाडी, देविदास परब, मुकुंद घाडी, अमित घाडी, सुरेश मानवर, हरेष फडते, पार्थ डिचवलकर उपस्थित होते.

योग्य पद्धतीने औरंगजेबची कबर पूर्णपणे काढून टाकावी तसे न झाल्यास पूर्वसूचित करून हिंदू, विश्व परिषद बजरंग दल व हिंदू समाजाबरोबर छत्रपती संभाजीनगरकडे कार सेवेसाठी कूच करून औरंगजेबाची कबर उध्वस्त करतील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.

सौजन्य : मालवण ब्यूरो

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स