ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
जिल्ह्यातील क्रीडा पंचांची सभा.

जिल्ह्यातील क्रीडा पंचांची सभा.

प्रकाशन: 17 Mar 2025 12:20 AM
वाचन संख्या 200

सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने अध्यक्ष अजय शिंदे यांचे उपस्थितीचे आवाहन.

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व क्रीडा पंचांची एकजुट, सन्मान, मैदानावरील पंच सुरक्षितता, मेहनताना आणि क्रीडा पंचांच्या विषयक अनेक बाबींवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी व पंचांना एकत्रित करुन ड्रेसकोड, ओळखपत्र यासंदर्भात निश्चिती करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने क्रीडा पंचांसाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. न्यू इंग्लिश स्कूल, ओरोस हायस्कूल येथे शुक्रवार दिनांक २१/३/२०२५ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता जिल्ह्यातील सर्व पंचांची ही सभा आहे.

या पंच बैठकीत पंचांसाठी नियमावली, पंचाचा प्रवास खर्च , दैनंदिन मानधन, पंचांचा गणवेश, पंचांचे ओळखपत्र यासाठी ‌चर्चा करून अंतिम निर्णय घेतले जातील. या सभेला क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हाध्यक्ष अजय शिंदे, कार्याध्यक्ष विजय मागाडे, सचिव नंदकिशोर नाईक, सह सचिव कमलाकर धुरी, उपाध्यक्ष जयराम वांयगणकर, विजय मयेकर, सुदिन पेडणेकर, कोल्हापूर विभागीय उपाध्यक्ष मारुती माने, कोल्हापूर विभागीय संघटक अजय सावंत, कोल्हापूर विभागीय एक्झिक्युटिव्ह मेंबर संतोष तावडे आदी मार्गदर्शन करणार आहेत.

या सभेला जिल्ह्यातील सर्व जुन्या, नवीन पंचांनी उपस्थित रहावे असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स