श्री. अशोक दाभोलकर - मेस्त्री व श्री. दिपक सावंत यांचा विशेष सन्मान.
मसुरे | प्रतिनिधी : रंजन क्रीडा मंडळ, देवाळे, वसई, पालघर आयोजित राज्यस्तरीय शूटिंगबॉल स्पर्धेचे औचित्य साधून मुंबई शूटिंगबॉलचे सचिव श्री. दिपक सावंत व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूतपूर्व फेडरेशन रेफरी व क्रीडा संस्कृती प्रचारक श्री अशोक दाभोलकर मेस्त्री यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पालघर जिल्हात गेली तीन दशके शूटिंगबॉल खेळाचा प्रचार व प्रसारासाठी दिलेल्या सेवेबद्दल प्रमुख पाहुणे श्री. सुदेश चौधरी ह्यांच्या हस्ते दोघांना गौरविण्यात आले.
त्यावेळी व्यासपिठावर श्री. ओनिल जॉन आल्मेडा (संचालक,बसीन कॅथोलिक को ऑप. बँक लि.), श्री. नरेंद्र रघुनाथ राऊत (अध्यक्ष,सोमवंशी क्षत्रिय समाज महामंडळ, वसई), श्री.सुरेश प्रभाकर वर्तक ( कार्यकारी विश्वस्त,सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ), दिपक सावंत ( सचिव- मुंबई शूटिंगबॉल) आदी मान्यवर उपस्थित होते.
ह्या स्पर्धेत जयंत घोरपडे. स्पोर्टस् टेंबुर्ली विजेते ठरले तर डायरेक्ट शूटिंगबॉल संघटनेचे अध्यक्ष श्री. संजय कदम ह्यांचे मार्गदर्शन व सिंधुदुर्ग जिल्हाचा नामवंत खेळाडू रिकी नेमण ह्याच्या नैतृत्व लाभलेल्या सिंधुदुर्ग संघानी स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकावला. ह्या स्पर्धेत महाराष्ट्रातील २४ नामवंत संघानी भाग घेतला होता.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)