ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
शिवायन महानाट्यासाठी मोठ्या प्रमाणात बैठक व्यवस्था.

शिवायन महानाट्यासाठी मोठ्या प्रमाणात बैठक व्यवस्था.

प्रकाशन: 15 Mar 2025 10:40 AM
वाचन संख्या 89

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १६ मार्चला सादरीकरण.

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची नाट्यस्थळ बोर्डिंग ग्राउंड येथे माहिती.

मालवण | ब्यूरो न्यूज : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १६ मार्च रोजी मालवण टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर सायंकाळी ‘शिवायन’ या ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. हजारोंच्या उपस्थितीत भव्यदिव्य स्वरूपात या महानाट्याचे सादरीकरण होणार आहे अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली.

सोमवार १७ मार्च रोजी त्यांचा वाढदिवस आहे मात्र आमदार अधिवेशनात असल्याने रविवार १६ मार्च रोजी मालवण कुडाळ मतदार संघात त्यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने मोठया उत्साहात साजरा केला जाणार आहे. यावेळी आमदार निलेश राणे यांच्यासह प्रमुख उपस्थिती माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर तसेच महायुतीचे सर्व नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहेत. आमदार निलेश राणे यांना आशीर्वाद देण्यासाठी जनता मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार असल्याचे श्री. दत्ता सामंत यांनी यावेळी सांगितले.

शिवायन नाटकाचे नाट्यस्थळ बोर्डिंग ग्राउंड येथे श्री. दत्ता सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना पदाधिकारी संजय पडते, बबन शिंदे, आनंद शिरवलकर, दीपलक्ष्मी पडते, बाळा चिंदरकर, विश्वास गांवकर, दादा साईल, दीपक पाटकर, किसन मांजरेकर, रत्नाकर जोशी, जॉन नरोना, मधुकर चव्हाण, राजु बिडये, मंदार लुडबे, बिरमोळे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

जास्तीत जास्त प्रेक्षकांना हे महानाट्य पाहता यावे यासाठी मोठया प्रमाणात बैठक व्यवस्था करण्यात येत आहे. हा संपुर्ण सोहळा ऐतिहासीक ठरेल असे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले.

( फोटो सौजन्य : मालवण ब्यूरो )

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स