ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवण ग्रामीण रुग्णालयाची क्षमता ३० बेड वरून ५० बेड  वाढविण्यास मान्यता..!

मालवण ग्रामीण रुग्णालयाची क्षमता ३० बेड वरून ५० बेड वाढविण्यास मान्यता..!

प्रकाशन: 27 Oct 2021 12:54 AM
वाचन संख्या 74

आरोग्य राज्यमंत्री माननीय राजेंद्र पाटील यड्रॉवकर यांच्या उपस्थितीतील मुंबई येथील बैठकीतला महत्वाचा निर्णय…!

आमदार वैभव नाईक यांनी दिली माहिती

मालवण | ब्युरो न्यूज : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक नियमीत पाठपुरावा करत असलेल्या मालवण ग्रामीण रुग्णालयाची ३० बेड वरून ५० बेड क्षमता वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रॉवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील शासकीय निवासस्थानी यासंदर्भातील बैठक संपन्न झाली. तसेच मालवण ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय म्हणून दर्जोन्नती देण्याबाबतचा  प्रस्ताव व रुग्णालय उभारणीचे अंदाजपत्रक तात्काळ सादर करण्याच्या सूचना आरोग्य विभागाचे अधिकारी व सार्वजनिक बांधकामाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच जिल्ह्यातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व  सुरक्षा रक्षक यांची  प्रलंबित वेतने तात्काळ देण्याच्या व  आरोग्य विभागातील रिक्तपदे भरण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या  आहेत अशी माहिती आ.वैभव नाईक यांनी दिली.      सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुका हा पर्यटन दृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो. त्यादृष्टीने याठिकाणी सर्व सोयी   सुविधा उभारण्यावर आमदार वैभव नाईक यांनी भर दिला आहे. मालवण ग्रामीण रुग्णालयात मालवणसोबत देवगड, वेंगुर्ले येथील रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. त्यांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयाचे  उपजिल्हा रुग्णालय होण्यासाठी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आ.  वैभव नाईक यांचा पाठपुरावा सुरु आहे. त्यांच्या पाठपुराव्यानुसार आज याप्रश्नी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रॉवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत बैठक संपन्न झाली. बैठकीत त्याबाबत चर्चा करून  मालवण ग्रामीण रुग्णालयाची ३० बेड वरून ५० बेड क्षमता वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे.यावेळी आरोग्य सहसंचालक श्री. आंबर्डेकर, आरोग्य उपसचिव श्री. बलकवडे, आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर, सचिन बडवे, सुरक्षा रक्षक प्रमुख श्री. गुरव आदी उपस्थित होते.
या वाढलेल्या बेडच्या क्षमतेमुळे मालवण ग्रामीण रुग्णालयातील रुग्णसेवा अधिक सक्षम होईल असा प्राथमिक अंदाज व समाधान व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स