ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
झी नाट्य गौरव पुरस्कारावर सिंधुदुर्गची मोहोर.

झी नाट्य गौरव पुरस्कारावर सिंधुदुर्गची मोहोर.

प्रकाशन: 04 Mar 2025 08:56 PM
वाचन संख्या 55

सुनील हरिश्चंद्र उत्कृष्ठ दिग्दर्शक तर निहारिका राजदत्त उत्कृष्ठ अभिनेत्री पुरस्काराची मानकरी.

मसुरे | प्रतिनिधी : नाट्यसृष्ठिमध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या झी गौरव पुरस्कारांचे नुकतेच वितरणय झाले. उर्मिलायन या व्यावसाईक रंगभूमीवरील गाजत असलेल्या नाटकासाठी ज्यूरी अवार्ड सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार कुडाळ तालुक्यातील कुसबे गावच्या सुनील हरिश्चंद्र यांना तर त्यांची पत्नी निहारिका राजदत्त यांची याच नाटकासाठी ज्यूरी अवार्ड सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. निहारिका राजदत्त यांचे माहेर मसूरे देऊळवाडा येथे तर आजोळ मुणगे देवगड येथे आहे. झी गौरव मध्ये या नाटकाला एकूण ११ पुरस्कारपैकी ८ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

या पुरस्काराबद्दल निहारिका राजदत्त म्हणाल्या, पहिलं व्यावसायिक नाटक आणि पहिलाच झी गौरव पुरस्कार माझ्यासाठी खास आहे.
उघड्या डोळ्यांनी बघितलेलं १७ वर्ष उराशी बाळगून ठेवलेलं हे स्वप्न सत्यात उतरलं. उर्मिलायन नाटकाने मला आयुष्यात खूप काही दिलं. ज्युरी विशेष झी गौरव अभिनेत्री पुरस्कार” त्यातलं एक आहे. स्पेशल ज्यूरी अवॉर्डच एक वेगळं कुतूहल आणि आकर्षण होत. आजवर स्मिता पाटील, शबाना आझमी, मनिषा कोयराला, कोंकना सेन, इरफान खान, मनोज वाजपयी, नवाझुद्दीन यां सारख्या अनेक मातब्बर कलाकारांना ज्युरी अवॉर्ड मिळाली आहेत. त्यामुळे या पुरस्काराला वेगळे महत्व आहे. आपलं काम परिक्षकांनी ध्यानी आणि मनी ठेऊन त्याच कौतुक करणे, पुरस्कारांमधे त्याला विशेष एक दर्जा दिला आहे हेच खूप भारी आहे.

निहारिका यांचे पती सुनिल हरिश्चंद्र हे कुसबे, कुडाळ येथील मूळ रहिवासी आषून गेल्या २६ वर्षापासून नाट्यसृष्टीत सातत्याने ते कार्यरत आहेत.

झी गौरव पाठोपाठ म. टा. सन्मान पुरस्कार मधे सुद्धा सर्वोत्कृष्ट लेखक व दिग्दर्शक हि नामांकन जाहीर झाले आहे. निहारिका राजदत्त तांबे ही मसूरे गावचे सुपुत्र पदवीधर शिक्षक तथा दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग अध्यक्ष आनंद तांबे व शिक्षक सुगंध तांबे यांची पुतणी तर सामाजिक कार्यकर्ते वी. रा. तांबे यांची नात आहे. दोघांच्या यशा बद्दल कौतुक होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स