ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आस्था गृप मालवणच्या वतीने आदित्य बादेकर यांचा सत्कार.

आस्था गृप मालवणच्या वतीने आदित्य बादेकर यांचा सत्कार.

प्रकाशन: 04 Mar 2025 09:21 PM
वाचन संख्या 112

मालवणचे सुपुत्र सुप्रसिद्ध चित्रकार श्रीधर बादेकर यांचे चिरंजीव आणि छावा चित्रपटाचे व्हिएफएक्स निर्माते आहेत आदित्य बादेकर.

मालवण | ब्यूरो न्यूज : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाचे व्हीएफएक्स निर्माते आणि मालवणचे सुपुत्र आदित्य श्रीधर बादेकर यांचा मालवण रेवतळे येथे आस्था ग्रुप मालवणच्या वतीने सत्कार करण्यात आला.

मालवणचे प्रसिद्ध चित्रकार श्रीधर बादेकर यांचे आदित्य बादेकर हे सुपुत्र असून ते सिनेसृष्टीत व्हिएफएक्स निर्माते म्हणून कार्यरत आहेत. बहूचर्चित छावा चित्रपटासाठी त्यांनी आपल्या टीमसमवेत व्हिएफएक्स सिन साकारले आहेत. त्यांच्या या कामगिरीबद्दल आस्था ग्रुपतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. आस्था ग्रुपचे अध्यक्ष उमेश मांजरेकर यांच्या हस्ते बादेकर यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आदित्य बादेकर यांनी छावा चित्रपटाविषयी तसेच त्यातील आपल्या व्हिएफएक्सच्या कामाबाबत माहिती दिली. यावेळी उपस्थितांनी बादेकर यांच्या कामगिरीची प्रशंसा करत शुभेच्छा दिल्या.

यावेळी सौगंधराज बादेकर, भाऊ सामंत, बंटी केनवडेकर, मनोज चव्हाण, श्रीराज बादेकर, निनाद बादेकर, भूषण मेतर आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 9
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 317

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स