ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आपत्तीग्रस्त जाधव कुटुंबियांना शासनाकडून 4 लाखांची मदत

आपत्तीग्रस्त जाधव कुटुंबियांना शासनाकडून 4 लाखांची मदत

प्रकाशन: 06 Aug 2021 12:48 PM
वाचन संख्या 53

कणकवली / उमेश परब –
२३ जुलै च्या अतिवृष्टीत कणकवली तालुक्यातील दिगवळे रांजणवाडी येथील जाधव कुटुंबियांच्या घरावर दरड कोसळून प्रमिला जाधव यांचा मृत्यू झाला होता. तर पती प्रकाश जाधव हे गंभीर जखमी झाले होते. मृत प्रमिला यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता तर जखमी प्रकाश याना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नैसर्गिक आपत्तीत प्रमिला जाधव यांचा मृत्यू झाल्यामुळे शासन नियमानुसार त्यांच्या वारसांना आर्थिक मदत मिळण्यासाठी तहसीलदार रमेश पवार यांनी तात्काळ शासन स्तरावर प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर मयत प्रमिला जाधव यांचा मुलगा प्रमोद याच्याकडे 4 लाख रुपयांचा धनादेश प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या हस्ते तहसीलदार रमेश पवार यांच्या उपस्थितीत सुपूर्त करण्यात आला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स