आचरा येथे शिवजयंती सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम.
आचरा | प्रतिनिधी :सिंहगर्जना ग्रुप आणि यशराज प्रेरणा आचरा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती सोहळा साजरा केला जाणार आहे. यानिमित्त सकाळी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजता वाहन फेरी, साडेनऊ वाजता शिवाजी महाराज मूर्ती पूजन, दहा वाजता सत्यनारायण महापूजा शालेय विद्यार्थ्यांचा गुणदर्शन कार्यक्रम साहसी खेळ, सायंकाळी ४.३० वाजता हळदीकुंकू समारंभ, सात वाजता भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवप्रेमींनी सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)