ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय चौकेकर आणि समाजसेविका वंदना करंबेळकर यांना बॅरिस्टर नाथ पै सेवांगणचे पुरस्कार.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय चौकेकर आणि समाजसेविका वंदना करंबेळकर यांना बॅरिस्टर नाथ पै सेवांगणचे पुरस्कार.

प्रकाशन: 15 Feb 2025 04:12 PM
वाचन संख्या 79

मसुरे | प्रतिनिधी : बॅरिस्टर नाथ पै सेवांगण कट्टा यांचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. मालवण तालुक्यातील चौके गावचे सुपुत्र, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय चौकेकर यांना संजय नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदर्श शिक्षक कार्यकर्ता पुरस्कार तर बापूभाई शिरोडकर स्मृति आदर्श समाजसेविका पुरस्कार निरामय केंद्र कोलगावच्या सचिव श्रीमती वंदना करंबेळकर यांना बॅ नाथ पै सेवांगण कट्टा यांच्यावतीने जाहीर झाला आहे. मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक, पेंडूरचे माजी सरपंच व कट्टा दशक्रोशीतील शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्व संजय नाईक यांचे अलीकडेच अकाली निधन झाले. त्यामुळे त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदर्श शिक्षक कार्यकर्ता पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले होते. तो पुरस्कार चौके गावचे सुपुत्र, माजी मुख्याध्यापक विजय चौकेकर यांना जाहीर झाला आहे.

विजय चौकेकर यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्ह्यातील अनेक शाळात काम केले आहे. उच्चश्रेणी मुख्याध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार उन्नती समाज मालवण तालुक्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. सध्या ते सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत प्राथमिक शिक्षक असोसिएशनच्या मालवण तालुक्याचे अध्यक्ष आहेत. त्या माध्यमातून ते अनेक उपक्रम राबवत असतात. सध्या त्यांनी जादूटोणा विरोधी कायदा २०१३ च्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी वाहून घेतले आहे. सिधुदुर्गातील अनेक गावे, शाळा महाविद्यालये अशा ठिकाणी अनेक शिबीरे ते या कायद्याची माहिती देण्यासाठी जातात व प्रात्यक्षिके दाखवतात. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी संजय नाईक स्मृति आदर्श शिक्षक कार्यकर्ता पुरस्कार विजय चौकेकर यांना जाहीर करण्यात आला आहे.

बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने बापूभाई शिरोडकर स्मृति आदर्श समाजसेविका पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो. यावर्षी निरामय केंद्र कोलगावच्या सचिव श्रीमती वंदना करंबेळकर यांना जाहीर झाला आहे. वंदना करंबेळकर या स्टेंट बॅक ऑफ इंडियाच्या माजी कर्मचारी असून समाज सेवेसाठी त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. स्टेट बँकेचा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार ही त्यांना मिळाला आहे. निरामय केंद्राच्या माध्यमातून त्या गेली ३० वर्ष सामाजिक सेवेत आहेत. ही संस्था प्रामुख्याने आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रात काम करते. आर्थिक दृष्ट्या दुर्बळ विद्यार्थ्याना शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. अन् ही सेवा गेली ३० वर्ष सातत्याने सुरू आहे. वंदना करंबेळकर यांचे साहित्य क्षेत्रातही मोठे योगदान आहे. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त तेलुगु लेखिका श्रीमती होल्गा यांच्या तीन पुस्तकांचे अनुवाद त्यांनी केले आहेत. त्याशिवाय व्यंकटेश राजन यांच्या बोधशाला या अनुभव कथनाचा अनुवाद प्रकाशित केला आहे. याची दखल घेवून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

शिवजयंती दिनी बुधवार १९ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजता केंद्र शाळा कट्टा नं १ सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहाण्याचे आवाहन बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, शाम पावसकर, वैष्णवी लाड, दीपक भोगटे, विणा म्हाडगुत, विकास म्हाडगुत यानी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स