ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
राष्ट्रीय स्तरावरील नेमबाजी स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग कॉलेज मालवणची विद्यार्थिनी हर्षदा पवार हिची निवड.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

राष्ट्रीय स्तरावरील नेमबाजी स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग कॉलेज मालवणची विद्यार्थिनी हर्षदा पवार हिची निवड.

प्रकाशन: 14 Feb 2025 09:27 PM
वाचन संख्या 41

मालवण | प्रतिनिधी : स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे एनसीसी विभागाअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेली तृतीय वर्ष कला शाखेची विद्यार्थीनी एनसीसी अंडर ऑफिसर हर्षदा दीपक पवार हिची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एनसीसी विभागातून राष्ट्रीय स्तरावरील नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झालेली हर्षदा पवार ही पहिली खेळाडू ठरली आहे.

हर्षदा पवार ही आर्मीकडून नेमबाजी स्पर्धे मध्ये सहभागी झालेली आहे. ती सध्या ’58 महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग’ एनसीसी विभागाकडून खेळत आहे. आतापर्यंत तिने दहा दिवसाचे ११ कॅम्प केलेले आहेत. त्याचबरोबर एक महिन्याचे दोन कॅम्प केलेले आहेत. त्या प्रत्येक कॅम्पमध्ये ती विजयी झाली असून ९ फेब्रुवारीपासून ९ मार्चपर्यंत दिल्ली या ठिकाणी होत असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील नेमबाजी स्पर्धेत आर्मी एनसीसी कडून तिची निवड झालेली आहे. तिने कोल्हापूर, पुणे, मुंबई ,तामिळनाडू ,केरळ,आणि भोपाळ अशा अनेक ठिकाणी आणि राज्यातून विविध फायरिंग कॅम्पमध्ये विजयी होऊन पुढील फेरीसाठी तिची निवड होत गेलेली आहे. भारतामध्ये एनसीसी अंतर्गत असणारे विद्यार्थ्यांची संख्या १५ लाख पेक्षा अधिक आहे. कुमारी हर्षदा हिचे मालवणच्या भंडारी ए सो हायस्कूल मध्ये माध्यमिक शिक्षण झाले आहे. तिची २०१९ साली सर्वप्रथम दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील एअर रायफलिंग शुटींग स्पर्धेसाठी निवड झाली होती

सध्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या हर्षदा हिला गेली दोन वर्षे आर्मी ऑफिसर कर्नल दीपक दयाल तसेच सुभेदार मेजर दिनेश गेडाम, ॲडम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक, एनसीसी असोसिएट ऑफिसर लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. एम. आर. खोत यांचे मार्गदर्शन लाभत आहे हर्षदा हिच्या या यशाबद्दल आणि सिंधुदुर्ग कॉलेजचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, कृ. सी. देसाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सीडीसी अध्यक्ष समीर गवाणकर, सेक्रेटरी गणेश कुशे, शालेय समिती अध्यक्ष साईनाथ चव्हाण यांच्यासह संस्था पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, एनसीसी कडेटस् यांनी अभिनंदन केले आहे.

मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे व पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनीही तिचे अभिनंदन आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 448

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स