ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवणात हिंदुधर्मरक्षक श्रीमंत भागोजीशेठ कीर जन्मोत्सव सोहळा नियोजन सभा संपन्न.

मालवणात हिंदुधर्मरक्षक श्रीमंत भागोजीशेठ कीर जन्मोत्सव सोहळा नियोजन सभा संपन्न.

प्रकाशन: 14 Feb 2025 09:39 AM
वाचन संख्या 109

मालवण | प्रतिनिधी : हिंदू धर्मरक्षक श्रीमंत भागोजीशेठ कीर यांचा जन्मोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे महाशिवरात्री दिनाला मुंबई येथे संपन्न होत आहे. त्या पार्श्वभूमीवर १३ फेब्रुवारी २०२५ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या दैवज्ञ भवन सभागृहात नियोजन बैठक संपन्न झाली. या सभेला भागोजीशेठ कीर स्मृती समिती उपाध्यक्ष व राष्ट्रसंत प. पू पाचलेगांवकर महाराजांचे शिष्य श्रीकांत सावंत यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती. यावेळी मालवणचे माजी उपनगराध्यक्ष श्री. महेश जावकर, सिंधुदुर्ग जिल्हा अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष श्री. हेमंत करंगुटकर, अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे विश्वस्त लक्ष्मण (बाबू) सावंत व सामाजिक कार्यकर्त्या श्रीम. नीलम शिंदे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना श्रीकांत सावंत यांनी सांगितले की हिंदू धर्मरक्षक श्रीमंत भागोजीशेठ कीर यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी भागोजीशेठ कीर स्मृती समिती यांच्या वतीने २६ फेब्रुवारी रोजी भव्य शोभा यात्रा व अभिवादन सभा संपन्न होत आहे. मालवण तसेच जिल्ह्यातील सकल हिंदू परिवार व मित्रमंडळी यांनी जास्तीत जास्त संख्येने त्यात सहभागी व्हावे. भव्य शोभायात्रा बुधवार दि. २६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता बंगाल केमीकल नाका( सेंच्युरी बाजार)वरळी ते भागोजी कीर स्मृतीस्थळ, दादर चौपाटी अशी काढण्यात येणार असून संध्याकाळी ६.३० वाजता अभिषेक व अभिवादन सोहळा असा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.

श्रीकांत सावंत ( उपाध्यक्ष, भागोजीशेठ किर स्मृती समिती)

माजी नगराध्यक्ष श्री महेश जावकर व मान्यवर.

ऐश्वर्य मांजरेकर ( सूत्रसंचालक)

माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन युवा सामाजिक कार्यकर्ते ऐश्वर्य मांजरेकर यांनी केले. सभेच्या आयोजनाला सहकार्य केल्याबद्दल भागोजीशेठ स्मृती समिती उपाध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर व दैवज्ञ भवन यांचे विशेष आभार मानले.

या सभेला श्रीकांत सावंत,महेश जावकर, हेमंत करंगुटकर, लक्ष्मण ( बाबू) सावंत, नीलम शिंदे, ऐश्वर्य मांजरेकर यांच्यासह रवींद्र तळाशीलकर, राजेंद्र आंबेरकर, श्रीकांत वेंगुर्लेकर, ए.व्ही. गवंडे, भाऊ साळगावकर, पंकज पेडणेकर, संजय गावडे, बाळू नाटेकर, अरुण तोडणकर, रत्नाकर कोळंबकर, अंकित कोवळे, सुशांत भोजने, आशा वळपी, अंजना दत्तप्रसाद सामंत, क्रांती धुरी, प्रियांका मेस्त्री आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 445

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स