मळेवाड येथे २० फेब्रुवारी रोजी श्री गजानन महाराज प्रकटदिन सोहळा.
मळगाव | प्रतिनिधी : श्री गजानन महाराज मंदिर मळेवाड येथे गुरुवार २० फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यात, गुरुवार २० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ६.३० ते ९ वाजता पाद्यपूजाव पंचामृत महाअभिषेक आणि महापूजा सकाळी ९.३० ते १२ वाजता श्री दत्तमालामंत्र अनुष्ठान,दुपारी १२.३० ते १ वाजता महाराजांची महाआरती प्रकट समय, दुपारी १ ते ३ वाजेपर्यत महाप्रसाद ,दुपारी २ ते ५ वाजता गायन आणि भजनाचा कार्यक्रम, सायंकाळी ५ ते ६.३० वाजता श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, भरणी कुडाळ बुवा – विनोद चव्हाण (पखवाजसाथ- तुषार लोट, तबला – शिवराज पोईपकर), रात्री ७ वाजता महाराजांची पालखी प्रदक्षिणा,रात्री ८.३० वाजता महाआरती,रात्री ९.३० वाजता श्री गंगाळ देव नाट्यमंडळ, बिद्रूबाग मांद्रे गोवा प्रस्तुत लेखक आचार्य.प्र. के. अत्रे व दिग्दर्शक जयेंद्रनाथ हळदणकर तीन अंकी नाटकाचा ‘तो मी नव्हेच’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
सोहळ्यातील कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन गजानन महाराज सेवा मंडळ मळेवाड यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)