ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
मालवण पॉलिटेक्निकच्या ९० विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवण पॉलिटेक्निकच्या ९० विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.

प्रकाशन: 13 Feb 2025 10:35 PM
वाचन संख्या 185

मसुरे | प्रतिनिधी : गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मालवण (जीपीएम) च्या ९० विद्यार्थ्यांना नामांकीत कंपन्यांत प्लेसमेंट मिळाली आहे. ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंतच्या प्लेसमेंट डेटानुसार, महाविद्यालयातील ९० विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार मिळाल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य प्रकाश शिरहट्टी यांनी दिली. औद्योगिक क्षेत्रात नावाजलेल्या कंपन्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड केली असून, हे संस्थेसाठी अभिमानास्पद यश आहे असे त्यांनी सांगितले.

पुणे येथील वाहन उद्योगातील अग्रगण्य बजाज ऑटो कंपनीने इलेक्ट्रिकल – १६, इलेक्ट्रॉनिक्स २७ तर मेकॅनिकलच्या २३ विद्यार्थ्यांची निवड झाली. जीई एरोस्पेस पुणे या कंपनीत मेकॅनिकलच्या १० तर इलेक्ट्रिकलच्या ०८ विद्यार्थ्यांची निवड झाली. तसेच प्रो आर्क वेल्डिंग ॲन्ड कटींग सिस्टीम्स (Proarc Welding & Cutting Systems ) या कंपनीमध्ये इलेक्ट्रिकल – ०२ आणि इलेक्ट्राॅनिक्सच्या०४ विद्यार्थ्यांची निवड झाली.

सद्यस्थितीमध्ये विविध नामवंत कंपन्या फिलिप्स हेल्थकेअर पुणे, लार्सन & टुब्रो मुंबई, IFB ह्या कंपन्यानी ऑनलाइन पद्धतीने नियुक्तीसाठी भाग नोंदलेला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. पी. एस. शिरहट्टी आणि प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी श्री. आर. बी. बोर्डे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमासोबतच महाविद्यालयाच्या प्रशिक्षण व मार्गदर्शनामुळेच हे यश शक्य झाले आहे. संस्थेच्या या कामगिरीसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा राहिला आहे. या प्लेसमेंटमुळे विद्यार्थ्यांना प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये करिअर घडवण्याची संधी मिळाली आहे. बजाज ऑटो आणि GE एअरोस्पेस यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी संस्थेच्या गुणवत्तेवर विश्वास दाखवत विद्यार्थ्यांची निवड केली आहे. यामुळे महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि भविष्यात आणखी चांगली संधी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
या निवडीसाठी संस्थेचे प्राचार्य श्री. पी. एस. शिरहट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलाखतीद्वारे निवडीसाठी प्रशिक्षण व अस्थापना अधिकारी राहुल बोर्डे यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच इतर सर्व शाखांचे विभाग प्रमुख व विभागातील प्लेसमेंट अधिकारी विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी अथक प्रयत्न करत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स