ओरोस येथे नेव्हिगेशन प्रिसाईज लॅबोरेटरीचे वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन.
ब्यूरो न्यूज : ललित दहिबांवकर यांनी ओरोस येथील पोलीस मुख्यालयासमोरील पारकर बिल्डिंग येथे नेव्हिगेशन प्रिसाईज लॅबोरेटरी या नवीन व्यवसायाची सुरुवात केली असून माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते या लॅबोरेटरीचे सोमवारी उदघाटन करण्यात आले. यावेळी वैभव नाईक यांनी श्री दहिबांवकर यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी हृदयरोग तज्ज्ञ डॉ. नागेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नागेश ओरोसकर, छोटू पारकर, मनीष पारकर, भगवान परब,आप्पा मांजरेकर,धीरज मेस्त्री, सुजित निब्रे, परब व दहिबांवकर कुटुंबीय उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)