स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात साहित्य विषयक विशेष कार्यशाळा.
‘संवाद कवितेशी संवाद विद्यार्थ्यांशी’ विषयावर कवी विजय जोशी यांचे मार्गदर्शन.
मालवण : स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे मराठी विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आयोजित महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त कविता विषयक विशेष कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ कवी तथा गझलकार समीक्षक विजय जोशी म्हणाले की, समाज आणि साहित्य याचे एक अतूट नाते असत समाज जीवनात जे घडते तेच साहित्यातून आविष्कृत होत असते. साहित्यातून समाज वगळला तर साहित्यांचे मूल्य हे शून्यावर येईल म्हणूनच समाजाच्या जडणघडणीमध्ये साहित्यांचा वाटा हा मोलाचा असतो म्हणून माणसाने पुस्तके, समाज, साहित्य आणि माणूस डोळसपणे वाचला पाहिजे. हे ज्याला समजले त्याला साहित्य समजले आहे. जाणीवेतून जे स्फुरते, ते खरे साहित्य असते, कविता ही माणसाला जगायला शिकवते कारण कविता म्हणजे भावनेचा उत्कट आविष्कार असतो. मनातील भावना, कल्पना आणि विचार हे आत्मप्रकटीकरणाचे कविता हे सुंदर माध्यम आहे म्हणून साहित्यातील कविता हा प्रकार समजावून घेणे व तसे जगणे महत्वाचे आहे कल्पना आणि वास्तव यांचे मिश्रण करून लिहणे म्हणजेच कवी लेखक बनणे होय प्रत्येक माणसामध्ये एक कवी लेखक दडलेला असतो त्याचा शोध घेणे व त्याला वाव देणे गरजेचे आहे.
ही कार्यशाळा स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामधील मराठी विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आयोजित महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त ‘संवाद कवितेशी संवाद विद्यार्थ्यांशी’ या विषयावर विशेष आयोजीत केली गेली. यावेळी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवराम ठाकूर, डॉ. सुमेधा नाईक, प्रा. कैलास राबते, डॉ. एम. आर. खोत उपस्थित होते.
कार्यशाळेचे उद्घाटन श्री. विजय जोशी यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी श्री. विजय जोशी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वय डॉ. सुमेधा नाईक यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला जोशी यांनी अक्षर व मुक्तछंदातील कविता, अष्टाक्षरी कविता कशास म्हणतात याची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या स्वरचित कवितांचे सादरीकरण केले त्यात प्रामुख्याने आयूष्याचे गीत गाऊया, माझा त्वांड दिसता, गावाकडची माती, घंटा शाळेची, इत्यादी कवितांचे सादरीकरण केले. त्यांनी काही मालवणी कविता देखिल सादर केल्या. कविता, संवाद, गप्पा, चर्चा, माहिती, मार्गदर्शन असे या कार्यशाळेचे स्वरूप होते प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी या कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या व या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. प्रास्ताविक प्रा कैलास राबते यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. पी. बी. खरात व आभार प्रा डॉ एच. एम. चौगले यांनी मानले या कार्यशाळेस एन सी सी,एन एस एस व मराठी व वाणीज्य विभागाचे विद्यार्थी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)