ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
आस्था गृपच्या वतीने आयोजीत मालवण मॅरॅथॉन स्पर्धा उत्साहात.

आस्था गृपच्या वतीने आयोजीत मालवण मॅरॅथॉन स्पर्धा उत्साहात.

प्रकाशन: 25 Jan 2025 11:37 PM
वाचन संख्या 125

७०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग.

मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण येथील आस्था ग्रुपच्या वतीने आयोजीत आणि कै.अरुण काशिनाथ बादेकर ट्रस्ट यांच्या सहकार्यातून मालवण वासियांच्या आरोग्याच्या दृष्टीने धावण्याचा महत्वपूर्ण संदेश देणारी मालवण मॅरेथॉन स्पर्धा २५ जानेवारी रोजी उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत विविध गटात वेदांत पोफळे, महिमा मोहिते, तनिष मुळीक, दिविजा सातपुते यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

मॅरॅथॉन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी श्रीफळ वाढवताना मालवण पोलिस निरीक्षक श्री. प्रविण कोल्हे.

२५ जानेवारी रोजी सकाळी सात वाजल्यापासून रंगलेल्या या स्पर्धेत तालुक्यातील सुमारे ७०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले. या स्पर्धेचे उद्घाटन मालवण पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते सागरी महामार्ग येथे श्रीफळ वाढवून करण्यात आले. पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटात मुले व मुली स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले.

यावेळी आस्था ग्रुपचे अध्यक्ष उमेश मांजरेकर, बादेकर ट्रस्टचे अध्यक्ष गणेश बादेकर, राजन बादेकर, निनाद बादेकर, हरी चव्हाण, विद्याधर केनवडेकर, चौके उपसरपंच पांडुरंग चौकेकर, सूर्यकांत फणसेकर सौगंधराज बादेकर, भाऊ सामंत, आगोस्तीन डिसोझा, प्रशांत हिंदळेकर, प्रसाद बादेकर, सिद्धेश मांजरेकर, कुणाल मांजरेकर, अजय शिंदे, श्रीनाथ फणसेकर, सारिका शिंदे, कोळंब पोलीस पाटील संग्राम कासले, ललित चव्हाण, ओंकार यादव, उमेश शिरोडकर, रवी मिटकर, अमित खोत, पोलीस कर्मचारी गुरुप्रसाद परब, पप्पू गावकर, सचिन पेडणेकर, मनोज चव्हाण, गणेश गावकर आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत आचरा, कट्टा, मसुरे, मालवण, चौके, वायरी येथील स्पर्धक सहभागी झाले होते. यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.

यावेळी क्रीडा समन्वयक व शिक्षक अजय शिंदे यांनी अशा प्रकारे दरवर्षी स्पर्धा आयोजित करण्यासाठी खूप मेहनत लागते असे सांगितले. आस्था ग्रुपच्या वतीने दरवर्षी मुलांना प्रोत्साहन देणारी स्पर्धा आयोजित केली जात असल्याने मुलांच्याही क्रीडा कौशल्याला चांगली संधी मिळत आहे. या स्पर्धेत एकही स्पर्धक जखमी न होता स्पर्धा यशस्वी होणे कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले.

स्पर्धेचा निकाल : पाचवी ते सातवी गट मुलगे- द्वितीय- पृथ्वीराज राठोड (आचरा हायस्कूल), तृतीय- प्रणव गवंडी (जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल), मुली- द्वितीय- तन्वी शिंदे (चौके हायस्कूल), तृतीय- हर्षाली वेंगुर्लेकर (देऊळवाडा प्राथमिक शाळा) आठवी ते दहावी गट मुलगे- द्वितीय- आशीर्वाद सातपुते (आचरा हायस्कूल), तृतीय- दीप प्रभू (जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल), मुली द्वितीय- अनुष्का शिंदे (चौके हायस्कूल), तृतीय- किमया चव्हाण (चौके हायस्कूल).

विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी समस्त मालवणकर, पोलीस प्रशासन, शिक्षक वर्ग आणि आस्था ग्रुपच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. सौगंधराज बादेकर यांनी केले.

छायाचित्रे सौजन्य : मालवण ब्यूरो

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स