ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
मालवण शहर पाणीपुरवठा योजना वृद्धिंगत होणार.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवण शहर पाणीपुरवठा योजना वृद्धिंगत होणार.

प्रकाशन: 04 Jan 2025 06:06 PM
वाचन संख्या 75

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते ६ जानेवारीला भूमिपूजन शुभारंभ : खासदार नारायण राणे, मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती.

माजी नगरसेवक दीपक पाटकर यांची माहिती.

| ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान राज्यस्तर अभियानातून शहराची जलवाहिनी अर्थात शहर पाणीपुरवठा योजना वृद्धिंगत होणार आहे. सुमारे ४३ कोटी प्रशासकीय मान्यता रक्कमेतून नळपाणी योजनेचे विस्तारिकरण व नूतनीकरण होणार आहे. आमदार निलेश राणे यांच्या यशस्वी पाठपुराव्याने महायुती शासनाच्या माध्यमातून ही योजना मंजूर झाली आहे. अशी माहिती माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी दिली आहे.

पाणीपुरवठा योजना कामाचा भूमिपूजन शुभारंभ खासदार नारायण राणे, मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते सोमवार ६ जानेवारी रोजी येथे संपन्न होणार आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन जल शुद्धीकरण केंद्र कुंभारमाठ येथे होणार आहे. तर भरड येथील नगरपरिषद वाहनतळ येथे भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. सोहळ्याचे निमंत्रक नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे हे आहेत.

शहराला पाणीपुरवठा करणारी योजना माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी १९९९ साली साली विशेष बाब म्हणून मंजूर करून आणली. धामपूर तलावातून पाणी उपसा करून शहरापर्यत आणली गेलेली ही पाणीपुरवठा योजना अतिशय महत्वपूर्ण ठरली. शहरातील अनेक भागात उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणी टंचाई, किनारपट्टी भागात असलेली क्षारयुक्त पाण्याची समस्या यावर पाणीपुरवठा योजना वरदान ठरली. खासदार नारायण राणे यांचे दूरदृष्टी नेतृत्व व निधी खेचून आणण्याची धमक अतिशय महत्वाची राहिली.

दरम्यानच्या काळात पाणीपुरवठा नळकनेक्शन ग्राहक वाढत गेले. नागरिकांसाठी ही योजना जलवाहिनी बनली. योजनेवर भार वाढत गेले. योजनेवर दुरुस्ती करण्यात आली. कालांतराने आता जीर्ण झालेल्या या योजनेच्या नूतनीकरणसाठी मागील काही काळापासून निलेश राणे हे पाठपुरावा करत होते. अखेर नवी योजना मंजूर झाली.

धामापूर पंपिंग स्टेशनं येथे जादा क्षमतेचा पंप, धामापूर पंपिंग स्टेशन येथून कुंभारमाठ जलशुद्धीकरण प्रकल्प पर्यत पाईपलाईन तिथून शहरात पाईपलाईन, शहरांत दोन ठिकाणी काही लाख लिटर क्षमतेच्या पाणी साठवणूक टाक्या. कुंभारमाठ येथून अन्य मंजूर गावात पाणी नेण्यासाठी साठवणूक व्यवस्था अशा नव्या व दर्जेदार कामांचा समावेश असून नागरिकांनी नियमितपणे शुद्ध पाणी मिळावे यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. पावसाळी कालावधी वगळून दोन वर्षात मे. अभिषेक इन्फ्रा अँड डी. डी. कन्स्ट्रक्शन (जॉईंट व्हेन्चर) या मक्तेदार कंपनीला काम पूर्ण करण्याची मुदत आहे. कन्सल्टन्सी फर्म पीसीएसकेके (जेव्ही) मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम होणार आहे.

श्री. दीपक पाटकर ( माजी नगरसेवक, नगरपरिषद)

एकूणच साठी अत्यंत महत्वाची असलेली ही पाणीपुरवठा योजना नूतनीकरण व विस्तारित होत असल्याचा लाभ नागरिकांना होणार आहे. अतिशय महत्वाची योजना मार्गी लागत आहे अशी माहिती माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स