ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवण पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर.

मालवण पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर.

प्रकाशन: 04 Jan 2025 04:37 PM
वाचन संख्या 130

आमदार निलेश राणे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या प्रमुख उपस्थित पुरस्कारांचे वितरण.

मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने दिले जाणारे पत्रकार पुरस्कार तसेच मालवणरत्न व कलारत्न हे दोन विशेष पुरस्कार समितीच्या बैठकीत एकमताने निश्चित करणत आले. अध्यक्ष संतोष गावडे यांनी हे पुरस्कार पुरस्कार जाहीर केले.

जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये कै. नरेंद्र परब स्मृती पुरस्कार पत्रकार संग्राम कासले, कै. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती पुरस्कार पत्रकार केशव (भाऊ) भोगले, पत्रकार समिती व पत्रकार अमित खोत पुरस्कृत ‘बेस्ट स्टोरी अवार्ड’ हा विशेष पुरस्कार पत्रकार झुंजार पेडणेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. जेष्ठ पत्रकार सुरेश ठाकुर व नितीन आचरेकर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

दरम्यान मालवण पत्रकार समितीच्या वतीने गतवर्षी पासून मालवणरत्न व कलारत्न हे दोन नवीन विशेष पुरस्कार सामाजिक, कला क्षेत्रात आदर्शवत कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्याचा निर्णय झाला. यावर्षी मालवणरत्न हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असणाऱ्या ‘100 इडीयट’ या गृपला देऊन सन्मानित केले जाणार आहे. तर कलारत्न या पुरस्काराने साई पारकर यांचा सन्मान होणार आहे.

आमदार निलेश राणे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या प्रमुख उपस्थित या पुरस्कारांचा वितरण सोहळा लवकरच संपन्न होणार आहे.

मालवण तालुका पत्रकार समिती बैठकीत पुरस्कार निवड निश्चित झाली. यावेळी अध्यक्ष संतोष गावडे, सचिव सौंगंध बादेकर, जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर केनवडेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अमित खोत, तालुका उपाध्यक्ष कृष्णा ढोलम, तालुका उपाध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, खजिनदार सिद्धेश आचरेकर, सहसचिव संदीप बोडवे, महेश सरनाईक, प्रशांत हिंदळेकर, कुणाल मांजरेकर, मनोज चव्हाण, विशाल वाईरकर, भाऊ भोगले, परेश सावंत, अर्जुन बापर्डेकर, उदय बापार्डेकर, समीर म्हाडगुत, गणेश गांवकर, आप्पा मालंडकर, भूषण मेतर आदी उपस्थित होते.

मालवण पत्रकार समितीच्या वतीने गणेशोत्सव कालावधीत घेण्यात आलेल्या इकोफ्रेंडली गणेश सजावट स्पर्धेत विजेते ठरलेल्या प्रफुल्ल देसाई, भाऊ भोगले, दत्तप्रसाद पेडणेकर यांचा पुरस्कार वितरण सोहळ्यात सन्मान होणार आहे. अशी माहिती अध्यक्ष संतोष गावडे व सचिव सौंगंध बादेकर यांनी दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 282

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स