सागर सावंत मित्रमंडळ बांदा यांच्यातर्फे भव्य नरकासूर स्पर्धेचे आयोजन....!
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील ‘सागर सावंत मित्रमंडळ’ यांच्यावतीने नरकचतुर्दशीच्या निमित्ताने बांदेश्वर मंदिर जवळ देऊळवाडी येथे बुधवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी रात्री ८ते १० या वेळेत भव्य खुली नरकासूर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी फी आकारली जाणार नाही.कोणीही या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात.या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक १०,०००/- (दहा हजार रुपये) द्वितीय क्रमांक ५०००/-(पाच हजार रुपये) त्रुतीय क्रमांक २०००/- (दोन हजार रुपये) चौथा क्रमांक १०००/-(एक हजार रुपये) पाचवा क्रमांक १०००/-(एक हजार रुपये) पारीतोषिक ठेवण्यात आले आहे.ज्या सपर्धकांना सहभागी होयाचे आहे त्यांनी सर्वेश ९०९६७००५०७,गौरांग ९१४५१५९२१७ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आल्याचे मंडळाचे सदस्य अक्षय मयेकर यांनी सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)