ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
रजत तोरसकरची खेलो इंडिया आणि राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी दुसऱ्यांदा निवड.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

रजत तोरसकरची खेलो इंडिया आणि राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी दुसऱ्यांदा निवड.

प्रकाशन: 02 Jan 2025 04:07 PM
वाचन संख्या 65

मालवण | प्रतिनिधी : विद्यापीठ स्तरावरच्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धांमध्ये रजत ज्योती रविकिरण तोरसकर याने ‘रजत पदकासह’ भरीव कामगिरी केली. टेबल टेनिस खेळाच्या राष्ट्रीय विभागीय स्पर्धा नुकत्याच सटणा, मध्यप्रदेश येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये भारताच्या पश्चिम विभागातील महाराष्ट्र, गुजराथ, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यातील विद्यापीठांचा समावेश होता. या स्पर्धांमध्ये पश्चिम विभागातील ७२ विद्यापीठांनी भाग घेतला होता. कु. रजत तोरसकर व त्याच्या संघाने स्पर्धेमध्ये नागपूर विभागातील संत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत नागपूर संघाने उत्कृष्ट खेळ करत अंतिम आठ संघांमध्ये स्थान मिळवले. अंतिम आठ संघामध्ये झालेल्या राऊंड रॉबिन फेरीमध्ये चुरशीची झुंज देऊन संत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या टेबल टेनिस संघाने रौप्य पदक मिळवले. यामुळे त्यांची निवड राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या अंतिम विद्यापीठीय स्पर्धेसाठी झाली आहे. तसेच खेलो इंडिया स्पर्धा खेळण्याची संधी रजतला मिळणार आहे.

कु. रजत रविकिरण तोरसकर हा मालवण येथील टोपीवाला हायस्कूल आणि स. का. पाटील महाविद्यालय या शैक्षणिक संस्थांचा माजी विद्यार्थी आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे मालवण येथील कोरगावकर टेबल टेनिस अकादमीचे संस्थापक आणि त्याचे मार्गदर्शक विष्णू कोरगावकर तसेच त्याचे प्रशिक्षक डॉ. राहुल पंतवालावलकर, सिंधुदुर्ग टेबल टेनिस संघटनेचे श्री. हेमंत वालकर आणि इतर सदस्यांनी अभिनंदन केले आहे. रजत तोरसकरच्या यशामुळे जिल्ह्यातील खेळाडू याना प्रोत्साहन मिळणार आहे आणि टेबल टेनिस खेळाचा जिल्ह्यात प्रचार प्रसार होईल असे मत संबंधितांनी व्यक्त केले आहे. अ. शि. दे म. टोपीवाला हायस्कूल आणि स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय शिक्षकवृंद यांनी अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी रजतला शुभेच्छा दिल्या आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स