ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मळगांव हायस्कूलचे २७ डिसेंबर रोजी वार्षिक स्नेहसंमेलन.

मळगांव हायस्कूलचे २७ डिसेंबर रोजी वार्षिक स्नेहसंमेलन.

प्रकाशन: 25 Dec 2024 07:14 AM
वाचन संख्या 85

मळगांव | प्रतिनिधी : मळगांव ऐक्यवर्धक संघ मुंबई संचलित, मळगांव इंग्लिश स्कूल, मळगांव प्रशालेचा ६४ वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन शुक्रवार दिनांक २७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मळगाव ऐक्यवर्धक संघ मुंबईचे संचालक सीताराम नाईक, तर प्रमुख अतिथी डॉ. स्नेहल गोवेकर (होमिओपॅथीक डॉक्टर, सावंतवाडी) असून मळगाव ऐक्य वर्धक संघ मुंबईचे खजिनदार मोहन मुळीक, शाळा व्यवस्थापन समिती चेअरमन मनोहर राऊळ, शाळेचे माजी विद्यार्थी प्रदीप राणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सदर कार्यक्रम दोन सत्रात होणार असून सकाळच्या सत्रात मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण तर सायंकाळच्या सत्रात संध्याकाळी ६ वाजता विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शक कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमास पालक, सर्व माजी विद्यार्थी, ग्रामस्थांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करावा व विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आस्वाद घेऊन त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मळगाव ऐक्य वर्धक संघ मुंबईचे अध्यक्ष श्री. शिवराम तेली , सचिव श्री. आर. आर. राऊळ तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक एम. बी. फाले, पर्यवेक्षक एस.व्ही. कदम सर तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख बाबाजी सावंत, शालेय सांस्कृतिक मंत्री नारायण मांजरेकर, शालेय मुख्यमंत्री निधी राऊळ तसेच शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स