गोळवण कुमामे डिकवल ग्रामपंचायत तर्फे इलेक्ट्रिक वातानुकुलीन शव वाहिनीचे लोकार्पण.
पोईप | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील गोळवण कुमामे डिकवल ग्रामपंचायत तर्फे १५ व्या विक्त आयोग मधून खरेदी केलेल्या इलेक्ट्रिक वातानुकुलीन शव वाहिनीचा लोकार्पण सोहळा माजी उपसरपंच साबाजी गावडे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. तसेच नंदादीप नाईक यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
या लोकार्पण प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर, ग्रा.पं. सदस्य एकादशी गावडे, प्राजक्ता चिरमुले, मेघा गावडे, भाई चिरमुले, गोळवण आरोग्य विभागाचे औषध निर्माण अधिकारी प्रतापसिह नांगरे, परिचर संजय कांदळकर, आरोग्य सहाय्यक हेमंत चव्हाण, नागरिक बहुउद्देशक सेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग अनिल गावडे, शेलटकर, भाई चिरमुले, आनंद लोखंडे, प्रमोद पवार, रमेश परब, ग्रामपंचायत कर्मचारी प्रसाद परब, तंटामुक्त अध्यक्ष संजय पाताडे, बाबुराव चिरमुले, गजानन घाडीगावकर, अनिल घाडी आदी उपस्थित होते. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते कै. रमेश परब (पेंडूरकर) यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)