ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आगीत होरपळून दुर्दैवी अंत.

आगीत होरपळून दुर्दैवी अंत.

प्रकाशन: 25 Dec 2024 10:49 AM
वाचन संख्या 415

चौके येथील घटना.

ब्यूरो न्यूज | मालवण : मालवण तालुक्यातील चौके स्थळकरवाडीतील एका घरातील पडवीला (२४ डिसेंबर) मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आग लागल्याने घरात वास्तवव्यास असलेले दिपक सखाराम परब बावकर (वय ५५) यांचा अगीत होरपळून दुर्दैवी अंत झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. चौके स्थळकरवाडीत राहणारे दिपक सखाराम परब (बावकर) हे गावात मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत. गेली बरीच वर्षे पत्नी मुलांपासून बाजूला घराच्या मागील पडवीत अलिप्त राहत होते. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे आपल्या घरी असताना अचानक घराच्या मागील पडवीत आग लागून घराने पेट घेतला. यावेळी आजूबाजूच्या घरातील लोकांनी पडवीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाज्याला आतमधून कडी असल्यामुळे आणि आगीने मोठा पेट घेतल्याने ते शक्य झाले नाही. पडवीतून आगीचे लोळ येत होते. याबाबत चौके पोलीस पाटील यांना कल्पना देण्यात आली.

पोलीस पाटील यांनी घटनास्थळी येत मालवण पोलीस ठाणे येथे संपर्क साधत घटनेची माहिती दिली. आग आटोक्यात येत नसल्याने अखेर मालवण नगरपालिका अग्निशामक दलाला पाचरण करण्यात आले. सुमारे तासभर पाण्याचा मारा करून आग विजवण्यात आली. यानंतर पडवीत पूर्णपणे जळलेल्या अवस्थेतील दिपक यांचा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. पुढील कार्यवाहीसाठी रुग्णवाहिनीने मृतदेह मालवण ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आला.

यावेळी घटनास्थळी मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे साहेब, पोलीस कॉन्स्टेबल जानकर, प्रतीक जाधव, महादेव घागरे, हेमंत पेडणेकर, चौके पोलीस पाटील रोहन चौकेकर उपस्थित होते. आग नेमकी कशी लागली हे समजण्यात आले नाही. पुढील तपास मालवण पोलीस करत आहेत

यावेळी स्थानिक प्रीतम गावडे, मंदार गावडे, बंड्या गावडे, प्रतीक गावडे, मोहन गावडे, भाई गावडे, प्रवीण गावडे यांच्यासह अनेक युवकांनी व ग्रामस्थानी आग विजवण्यासाठी धाव घेतली. जळलेल्या मयत दिपक (बावकर) यांचा मृतदेह बाहेर काढण्यास सहकार्य केले. दिपक परब यांच्या पश्चात पत्नी, २ मुलगे, बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात शोक व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स