ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
आंतरराष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर मुंबईत सन्मानित

आंतरराष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर मुंबईत सन्मानित

प्रकाशन: 20 Dec 2024 02:40 PM
वाचन संख्या 121

मसुरे | प्रतिनिधी : सुप्रसिद्ध लेखिका श्रीमती विणाताई चारी ह्यानी लिहीलेल्या ‘विश्वकर्माचे वंशज’ ह्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा साहित्य संघ मंदिर, गिरगांव येथे जेष्ठ साहित्यिक व अमळनेर येथे झालेल्या ९७ वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ, रविंद्र शोभणे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. साहित्य, कला, क्रिडा, संगित, सामाजिक क्षेत्रात सामाजिक मुल्यांचे जतन करीत विश्वकर्मिय समाजाचे नाव राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार्‍या १९ दिग्गज व्यक्तिमत्वांचा जीवन आलेख श्रीमती विणाताईने ह्या पुस्तकात लिहीला असून दाभोली गावचे आंतरराष्ट्रीय शुटिंगबॉल पंच व जेष्ठ खेळ संस्कृती प्रचारक अशोक दाभोलकर मेस्त्री ह्यांत स्थान मिळविले आहे. या कार्यक्रमात अशोक दाभोलकर यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
अशोक दाभोलकर ह्यानी क्रिडा क्षेत्रात विविध पदावर उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर आज गेली अनेक वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवत ग्रामिण शाळांमधून पालक व पाल्याना चर्चासत्र व शिबिराव्दारे कोणत्याही मानधनाची अपेक्षा न करता खेळसंस्कृतीचा महत्व पटवून देण्याचे काम करीत आहेत.

त्यांच्या ह्या भरीव कामगिरीबद्दल त्यांचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, संजय कदम, सुरेंद्र सकपाळ, डॉ. श्रीकृष्ण परब, दतप्रसाद पेडणेकर, विश्वकर्मा सुतार समाजाचे अध्यक्ष श्री. शरद मेस्त्री सौ. अमिदी मेस्त्री आदी मान्यवरानी अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स