दिवसाला कोट्यवधी रुपये खर्च होणाऱ्या अधिवेशनांचे योग्य फळ जनतेला मिळालेच पाहिजे.
मानवता विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांची भूमिका.
प्रतिनिधी : मानवता विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी सरकारच्या अधिवेशनांबाबत भूमिका मांडताना प्रसिद्धी संदेशद्वारे सांगितले आहे की जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देश व त्यातील राज्ये ह्यांतील सरकारच्या अधिवेशनांवर दिवसाला कोट्यावधी रुपये खर्च होत असतो आणि तो स्वाभाविक आहे. हा होणारा खर्च कर व विविध माध्यमातून जनतेच्याच खिशातून होत असतो. अधिवेशनांसाठी इतका खर्च होणे यात काही गैर नाही परंतु त्या अधिवेशनांचे उद्देश हे जनतेच्या कल्याणासाठी आहेत. सर्व लोकप्रतिनिधींनी देखिल त्यांचा मौल्यवान वेळ जनतेसाठी दिलेला असतो त्यामुळे वेळ, श्रम, बुद्धी व पैसा अशा चार महत्वपूर्ण गोष्टींचं गांभीर्य राखत अधिवेशनांचे कामकाज होणे अपेक्षित आहे. या अधिवेशनांचे जनतेला योग्य फळ मिळालेच पाहिजे.
श्रीकांत सावंत यांनी पुढे सांगितले आहे की, महाराष्ट्र व देशातील युवा पिढिने अधिवेशनातील कामकाजांचा नागरीक म्हणून मागोवा घेणे, अभ्यास करणे ही राष्ट्राच्या विकासासाठी गुंतवणूक ठरू शकते.सध्या महागाई व बेरोजगारी सारखे मूलभूत प्रश्न ऐरणीवर असून आपण प्रत्येक सरकारचा घटक असलेल्यांची जबाबदारी व जागरुकता महत्वाची आहे असेही श्रीकांत सावंत यांनी सांगितले आहे. येणार्या काळात सत्ताधारी व विरोधी हे दोघेही समर्थपणे जनतेच्या विकासासाठी अत्यंत समर्थपणे झटत राहतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)