ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
चिंदर येथील रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

चिंदर येथील रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रकाशन: 17 Dec 2024 12:05 AM
वाचन संख्या 187

संदिप भाई पारकर स्मृती रक्तदान शिबिर’ आरोग्य उपक्रमाचे चिंदर सेवा संघाच्या वतीने आयोजन.

आचरा | प्रतिनिधी : चिंदर यात्रौत्सवाचे औचित्य साधून भगवती मंगल कार्यालय चिंदर येथे १६ डिसेंबर रोजी, चिंदर सेवा संघ आयोजित संदिप भाई पारकर स्मृती रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या शिबिराचा शुभारंभ प्रसंगी चिंदर सेवा संघ अध्यक्ष प्रकाश मेस्त्री, उपसरपंच दिपक सुर्वे, जिल्हा ब्लड बँक डॉ. पल्लवी सुरवसे, अमृत साटम, प्रदीप दळवी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.

चिंदर सेवा संघ गेलें पाच वर्ष रक्तदान शिबीर घेत असून अनेक व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी या रक्तदान शिबिरात झालेल्या उपयोग झाला आहे असे यावेळी बोलताना अध्यक्ष प्रकाश मेस्त्री म्हणाले तर उपसरपंच दिपक सुर्वे, मुंबई पोलीस दलातील निवृत्त प्रदीप दळवी यांनी रक्तदान शिबिराला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक, सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन ओमकार गोलतकर यांनी केले.

रक्तदान शिबिरात नारायण चिंदरकर, सचिन चिंदरकर, आशिष कोरगावकर, प्रथमेश अपराज, प्रज्ञेश चिंदरकर, प्रतीक मुळ्ये, हरेश पडवळ, रणजित दत्तदास, गोविंद गांवकर, रवींद्र गांवकर, दत्ताराम सावंत, शंकर पालकर, मयूर आचरेकर, आनंद कामतेकर, राजन गांवकर, विराज सावंत, शिशिर पालकर, प्रथमेश चव्हाण, दिपक तावडे, प्रितेश आडकर, राजेंद्र चिंदरकर, समिर अपराज, केतन कावले या तेवीस रक्तदात्यानी रक्तदान केले. तर सुनिल चिंदरकर, सुनिल देऊलकर, भक्ती राणे यांनी सहभाग दर्शवला.

या शिबीरासाठी अध्यक्ष प्रकाश मेस्त्री, सल्लागार भाई तावडे, चंद्रशेखर पालकर, संतोष अपराज, खजिनदार गणेश गोगटे, कार्यवाह सिद्धेश गोलतकर, सहकार्यवाह आशिष कोरगावकर, निशांत पारकर, सचिन चिंदरकर, विवेक परब, ओमकार गोलतकर, प्रसाद टोपले, अजित साटम आदींनी मेहनत घेतली. चिंदर सेवा संघाच्या वतीने रक्तदात्यांचे आभार मानण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स