ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
वायंगणी स्वामी समर्थ मठाचा १२ वा वर्धापन दिन सोहळा ११ डिसेंबर रोजी.

वायंगणी स्वामी समर्थ मठाचा १२ वा वर्धापन दिन सोहळा ११ डिसेंबर रोजी.

प्रकाशन: 10 Dec 2024 08:15 PM
वाचन संख्या 108

विविध कार्यक्रमांचे आयोजन.

ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठाचा बारावा वर्धापन दिन सोहळा ११ डिसेंबर पासून सुरू होत आहे. १३ डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात बुधवारी ११ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता श्री स्वामी समर्थ मठातून वायंगणी गावात पालखी प्रस्थान व वायंगणी गावात पालखी परिक्रमा, दुपारी बारा वाजता रवळनाथ मंदिर येथे महाप्रसाद सायंकाळी, सहा वाजता पालखीचे स्वामी मठात आगमन सात वाजता नित्य आरती. गुरुवार १२ डिसेंबर रोजी सकाळी पाच वाजता राजोपच्यारपूजा अभिषेक व सहस्त्र बिल्वार्पण , सकाळी नऊ वाजता ११श्री सत्यदत्त महापूजा, दुपारी आरती व महाप्रसाद सायंकाळी चार वाजता स्थानिकांची सुस्वर भजन होणार आहेत .शुक्रवार १३ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता सत्यनारायण महापूजा दुपारी महाप्रसाद सायंकाळी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, रात्री दहा वाजता श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ वायंगणी आयोजित देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ चेंदवण यांचा क्षेत्रपाल श्री देव क्षेत्रपाल श्री देव वेतोबा हा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे.

भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ वायंगणी चे अध्यक्ष सदानंद राणे व मंडळाचे पदाधिकारी सदस्य यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स