ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणात होणाऱ्या जलतरण स्पर्धेसंदर्भात शिल्पा खोत यांचे प्रशासनाला निवेदन.

मालवणात होणाऱ्या जलतरण स्पर्धेसंदर्भात शिल्पा खोत यांचे प्रशासनाला निवेदन.

प्रकाशन: 10 Dec 2024 05:27 PM
वाचन संख्या 104

मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण चिवला बीच येथे आयोजित केलेल्या जलतरण स्पर्धेत मध्ये सहभागी होणाऱ्या स्थानिक स्पर्धकांना फी मध्ये सूट मिळावी, अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांनी ५ डिसेंबर २०२४ मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे व मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे यांना दिले अशी माहिती शिल्पा खोत यांनी दिली आहे.

शिल्पा खोत यांनी दिलेल्या निवेदनात म्हणले आहे की,
मालवणमध्ये चिवला बीच येथे पोहण्याच्या स्पर्धा (स्विमिंग कॉम्पिटिशन) आयोजित केली जाते. चिवला बीच येथील समुद्रकिनाऱ्यावर मुंबईची एक संस्था दरवर्षी पोहण्याच्या स्पर्धा आयोजित करते. ह्या स्पर्धांसाठी प्रत्येक स्पर्धकाला रु. २०००/- (दोन हजार रुपये) शुल्क म्हणून आकारली जाते. ह्याद्वारे लाखो रुपयांचा नफा कमावला जातो, मात्र स्थानिक मुलांना या शुल्कामध्ये कोणत्याही प्रकारे सूट दिली जात नाही. स्थानिक मुलांचे पालक शहरवासियांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या संपन्न नसल्यामुळे, केवळ आर्थिक कारणास्तव स्थानिक मुलांना ह्या स्पर्धांमध्ये सहभागी होणे शक्य होत नाही. त्यामुळे नगरपरिषदेमार्फत स्थानिक भूमिपुत्रांना १००% फीमध्ये सूट देण्याची अट सदर संस्थेला परवानगी देतानाच घालण्यात यावी. तसेच गावातील भूमिपुत्रांसाठी हे धोरण कायम स्वरूपी ठेवावे व त्यांना फीमध्ये पूर्णतः माफी द्यावी. ह्या गोष्टीचा स्पष्ट उल्लेख प्रवेश अर्जामध्येच केलेला असावा. आमच्या ह्या विनंतीला मान्यता देऊन, स्थानिक मुलांना ह्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळावी असे निवेदनाद्वारे शिल्पा खोत यांनी म्हंटले आहे.

यावेळी माजी बांधकाम सभापती यतीन खोत, माजी नगरसेवक मंदार केणी, माजी नगरसेवक महेश जावकर, तपस्वी मयेकर, सन्मेष परब, अमन बांगी, बाबी जोगी शांती तोंडवळकर, मानसी घाडीगावकर, अश्विनी आचरेकर, तन्वी भगत, नंदा सारंग, निखील शिंदे, नरेश हुले आदी उपस्थित होते.

या निवेदनाबाबत, तहसीलदार वर्षा झाल्टे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समाजसेविका सौ. शिल्पा खोत यांनी दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स