ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
राज्यस्तरीय शुटिंग बॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

राज्यस्तरीय शुटिंग बॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रकाशन: 10 Dec 2024 03:26 AM
वाचन संख्या 47

शुटिंगबॉल असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार श्याम सावंत, सरचिटणीस दीपक सावंत आणि युनियन उपाध्यक्ष माजी नगरसेवक सुनिल अहिर व मान्यवरांची उपस्थिती.

सोलापूर संघ ठरला विजेता तर कावेरी संघाला द्वितीय स्थान.

मसुरे | प्रतिनिधी : राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने संघटनेचे संस्थापक कामगार महर्षी गं. द. आंबेकर यांच्या ६० व्या पुण्यस्मृती प्रित्यर्थ संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने ना. म. जोशी मार्ग, श्रमिक जिमखाना मुंबई येथे खेळविण्यात आलेल्या स्पर्धेत सोलापूर जि. युथ फेडरेशन मनेराजुरी संघ अजिंक्य ठरला. कावेरी नगर, पुणे हा संघ उपविजेता ठरला. मुंबईतील १४ तर राज्यातील १२ असे २६ संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. विजयी संघाला आंबेकर चषक-११ हजार रुपये रोख आणि उपविजयी संघाला आंबेकर चषक, ८ हजार रुपये रोख पारितोषिके, उपांत्य पराभूत संघाना प्रत्येकी ५ हजार रोख व चषक देऊन सरचिटणीस गोविंदराव मोहिते, खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष क्रीडा प्रमुख सुनिल बोरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सामन्याचे उद्घाटन शुटिंगबॉल असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार श्याम सावंत, सरचिटणीस दीपक सावंत आणि युनियन उपाध्यक्ष माजी नगरसेवक सुनिल अहिर यांच्या हस्ते झाले. उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सेक्रेटरी शिवाजी काळे, साई निकम, कार्यालयीन अधिक्षक मधु घाडी आदी त्या वेळी उपस्थित होते.

या शुटिंगबॉल सामान्यात प्रथम सोलापूर, द्वितीय कावेरी, तृतीय क्रमांक खानापूर संघ, चौथा क्रमांक संजय भोसले प्रतिष्ठान. सर्व‌ विजेत्या संघांना आंबेकर चषकासह रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट शुटर दस्तगीर(कावेरीनगर पुणे), सामनावीर जयंत खंडागळे (सोलापूर जिल्हा.) यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेत एकूण २६ बलाढ्य संघ‌ खेळले‌.२१ गुणांचा एक सामना घेण्यात येऊन‌, सामने बाद पध्दतीने खेळविण्यात आले. शुटिंगबॉल सामने यशस्वी करण्यासाठी मुंबई शुटिंगबॉल असोसिएशनचे सरचिटणीस दीपक सावंत, स्पर्धा प्रमुख अशोक चव्हाण, कार्याध्यक्ष जालंदर चकोर, स्पर्धा निरीक्षक खजिनदार प्रफुल्लकांत वाईरकर, निरीक्षक तथा सहसचिव मिलिंद बिर्जे, पांडुरंग सुतार, नाना वाघ यांनी परीश्रम घेतले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स