ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
वायरी भूतनाथ येथे संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी.

वायरी भूतनाथ येथे संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी.

प्रकाशन: 10 Dec 2024 03:20 PM
वाचन संख्या 124

मालवण | प्रतिनिधी : प्रतिवर्षाप्रमाणे दिनांक ८ डिसेंबर रोजी वायरी भूतनाथ तेलीवाडी येथील रहिवासी आनंद बाळा बांबार्डेकर यांच्या घरी संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी करण्यात आली. संत शिरोमणी आणि संत तुकाराम महाराज यांच्या चौदा टाळकरी पैकी एक प्रमुख आणि संत श्रेष्ठ, अखंड तेली समाजाचे दैवत समान असलेले संताजी महाराज जगनाडे( सदुंबरे) यांची यंदा ४०० वी जयंती होती.

या कार्यक्रमावेळी सुरवातीला वायरी गावच्या उपसरपंच सौ प्राची माणगावकर आणि उपस्थीत ग्रामस्थांनी तसेच तेली ज्ञाती बांधवांनी विधिवत पूजन केले. त्यानंतर उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य ममता तळगावकर यांच्या हस्ते संताजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी श्रीमती उर्मिला माणगावकर, सौ. आरती आनंद बांबर्डेकर, गुरुप्रसाद तळवडेकर, प्रसाद डिचवलकर, केशव कांदळकर, प्रतीक डिचवलकर, दादा वेंगुर्लेकर, उदय पाटकर, विठोबा तळवडेकर, आनंद बांबर्डेकर, कु. अमृता, कु. माही उपस्थित होते. आनंद बांबार्डेकर व दादा वेंगुर्लेकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स