ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
फोंडाघाट येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड..

फोंडाघाट येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड..

प्रकाशन: 06 Aug 2021 01:24 AM
वाचन संख्या 76

२ लाखांचा मुद्देमाल केला जप्त; चार आरोपींना अटक..

कणकवली / उमेश परब : कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील मच्छी मार्केटच्या मागे सुरु असलेल्या अंदर बाहर जुगारावर कणकवली पोलिसांनी धाड आज सायंकाळी ४ वाजता धाड टाकली. या धाडीत रोख ४१ हजार ५५५ रुपये व ३ मोटरसायकल दीड लाख,सतरंजी,पत्ते असा सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तसेच ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये श्यामसुंदर शिवाजी मोदी,(फोंडाघाट, कोरगावकरवाडी),हसन दलाल शेख (फोंडाघाट मारुती वाडी), संजय आकाराम सावंत (फोंडाघाट ),प्रज्वल दत्तात्रय मोदी(फोंडाघाट,कोरगावकरवाडी)आदींचा समावेश आहे.

फोंडाघाट बाजारपेठेमध्ये मच्छी मार्केट मागील अंदर बाहर जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचत गुरुवारी सायंकाळी ४ वाजता अचानक पणे धाड टाकून अंदर बाहर जुगार खेळणाऱ्या पकडले.त्यात ४ जण ताब्यात घेण्यात आले आहेत.तर तिघेजण पशार झाले आहेत. रोख ४१ हजार ५५५ रुपये, ३ मोटर सायकल असे मिळून दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ती कारवाई कणकवली पोलिस उपनिरीक्षक बापू खरात,अनमोल रावराणे, पोलीस हवालदार उत्तम वंजारे,पोलीस नाईक रुपेश गुरव, कैलास इन्कपाळ,सचिन माने वैभव कोळी आदींनी केली. अधिक तपास कणकवली पोलीस तपास करीत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स