महाराष्ट्र आता थांबणार नाही.
महायुती सरकारचा शपथ ग्रहण सोहळा.
ब्यूरो न्यूज : मुंबईमध्ये आजाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. यावेळी मंचावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. या कार्यक्रमाला मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल सी व्ही राधाकृष्णन, देशाचे गृहमंत्री अमित शहा, विविध केंद्रीय मंत्री, विविध राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित आहेत. शपथविधी सोहळ्यातील मंचावर ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ हे घोषवाक्य विशेष लक्ष वेधून घेत होते.
या सोहळ्याला राजकीय, औद्योगिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच साधू, संत व धर्मोपदेशक उपस्थित होते. शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मंत्रालयातील पत्रकार परीषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)