ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
महायुतीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनसेवा व विकासाच्या दृष्टीकोनातून एकसंघ काम करावे : आमदार निलेश राणे.

महायुतीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनसेवा व विकासाच्या दृष्टीकोनातून एकसंघ काम करावे : आमदार निलेश राणे.

प्रकाशन: 05 Dec 2024 05:20 PM
वाचन संख्या 116

मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे महायुतीतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विशेष आवाहन करत जनतेसाठी व विकासासाठी एकसंघ पद्धतीने जनसेवा व विकासाच्या दृष्टीकोनातून एकसंघ काम करावे असे आवाहन केले आहे. आमदार निलेश राणे म्हणतात की, येणार्या काळात मालवण कुडाळच्या जनतेला अभिप्रेत असलेले काम आपल्याकडून व्हावे ही आपली जबाबदारी आहे. जनतेने आपल्यावर मोठी जबाबदारी देत जो विश्वास दर्शवला आहे त्यानुसार जनतेशी बांधील राहून विकासकामांना प्राधान्य राहील. गावागावात विकासाचा जो शब्द आम्ही महायुतीच्या माध्यमातून दिला तो पुर्ण केला जाईल अशी ग्वाही आमदार निलेश राणे यांनी दिली.

महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जनतेची विकासकामे गतिमानरित्या पुर्ण होण्यासाठी एकत्रितपणे काम कराव हेच लक्ष ठेवले पाहिजे. निवडणुक निकाल लागला आहे. विजयी मताधिक्य देऊन जनतेने आपल्याला कौल दिला. त्यामुळे मताधिक्य एक मताचे कि लाखाचे हा विचार करताना लोकशाहीत जनमताचा अनादर करू नये. कुठे जास्त मताधिक्य, कुठे कमी मताधिक्य असेल त्याचा विचार करताना आपापसात कोणावरही टीका टिप्पणी, चिखलफेक करू नये. निवडणुक काळातील सर्व माहिती, मताधिक्य आकडेवारी सर्व पक्षाकडे, वरिष्ठ नेत्यांकडे आहे. त्यावर योग्य ते चितन ते करतील.

मात्र जनतेने जो विश्वास आपल्यावर दर्शवला, विकासकामे करण्याची जी जबाबदारी दिली ती पुर्ण करायची आहे. विकासकामा बाबत आमच्यावतीने जे जे शब्द दिले ते ते सर्व पुर्ण करण्याची जबाबदारी आता आपली आहे. त्यामुळे भाजपा, शिवसेना पदाधिकारी यांनी येणाऱ्या पाच वर्षात जनतेच्या विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून काम करावे. निवडणुक निकालाचे विश्लेषण अथवा मताधिक्य वरून आपापसात कोणतीही टीका टिपण्णी नको. आपली बांधिलकी आता मालवण कुडाळच्या जनतेशी आहे. मालवण कुडाळच्या गतिमान विकासाची आहेत. असेही निलेश राणे यांनी स्पष्ट केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 445

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स