ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यानंतर १०३ अपंग बांधवांच्या खात्यात अपंग निधी जमा.

आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यानंतर १०३ अपंग बांधवांच्या खात्यात अपंग निधी जमा.

प्रकाशन: 04 Dec 2024 05:31 PM
वाचन संख्या 98

शिवसेना जिल्हा संघटक माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांची माहिती.

मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यानंतर मालवण मधील १०३ अपंग बांधवांच्या खात्यात अपंग निधी जमा झाला आहे. याबद्दल सिंधुदुर्ग दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष सत्यम पाटील व सचिव दत्ता कामतेकर यांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेत त्यांचे आभार मानले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे उपस्थित होते. शिवसेना जिल्हा संघटक माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे ही माहिती दिली.

शिवसेना जिल्हा संघटक तथा मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मालवण नगरपालिकेच्या एकूण उत्पन्नातून बांधिल खर्च वजा जाता येणाऱ्या उत्पन्नाच्या ५ % अपंग निधी वाटप केला जातो. अपंगाच्या कल्याणासाठी २०१५ मध्ये तसा शासननिर्णय करण्यात आला होता. त्यावेळी ३ % अपंग निधी वाटप केला जात होता . २०१८ मध्ये या शासन निर्णयात सुधारणा करून अपंग निधी ५% करण्यात आला होता. दरवर्षी चतुर्थी किंवा दिवाळी च्या दरम्यान या निधीच वाटप केले जात होते. परंतु गेल्या चतुर्थीला तो निधी वाटला गेला नव्हता. अपंग संस्थेने लेखी निवेदन देवूनही दिवाळीलाही या निधीचे वितरण करण्यात आले नव्हते. नंतर निवडणुक आचारसंहिता असल्याचे कारण देऊन निधी वाटप करण्यात आला नव्हता.
दिवाळीच्या दरम्यान आचारसहिता लागणार याची पूर्व कल्पना असूनही याबाबत कुठलीही आगाऊ कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात आली नाही त्यामुळे ऐन दिवाळीत अपंग बांधवाना या निधी पासून वंचित रहावे लागले होते. शहराच्या विकास कामात अनास्था असणाऱ्या प्रशासकाकडून अपंगाच्या बाबतीतही हेळसांड करण्यात आली. या अपंग निधीबाबतची माहिती प्राप्त झाल्यावर शिवसेनेच्या वतीने माजी नगराध्यक्ष तसेच शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर यांनी निधीसाठी वंचित असलेल्या अपंगांना घेऊन आमदार निलेश राणे यांची भेट घेत त्यांना निवेदन देवून त्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यावेळी आमदार निलेशजी राणे यांनी आचारसहिता संपताच लगेच हा निधी वितरित करण्याबाबत प्रशासनाला सूचना करुन निधी वितरीत केला जाईल या बाबत आश्वासित केले होते. आचारसंहिता संपताच आमदार निलेश राणे यांच्या पाठपुव्यानंतर मालवण शहरातील १०३ अपंगांच्या खात्यात निधी जमा करण्यात आला आहे अशी माहिती शिवसेना जिल्हा संघटक माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स