ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट.

प्रकाशन: 04 Dec 2024 05:06 PM
वाचन संख्या 96

प्रतिनिधी | नितीन गावडे :मुंबई विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक धोरण म्हणजेच NEP २०२३ अंतर्गत बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्लेच्या अर्थशास्त्र विभागाने, ४ डिसेंबर रोजी उद्योजकता विकास विषयाच्या अनुषंगाने प्रकल्प अहवाल तथा क्षेत्र भेट दिली. वेंगुर्ल्यातील त्रिमुर्ती परफ्यूमरी वर्क्स या उद्योगाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने तसेच नवसंयोजन यशस्वीतेसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या भेट उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः प्रश्नावली तयार करुन त्रिमुर्ती परफ्यूमरी वर्क्स चे माली उद्योजक अभिषेक राजीव वेंगुर्लेकर यांच्याकडून औद्योगिक प्रक्रियेसंदर्भात माहिती घेतली. श्री. वेंगुर्लेकर यांनी त्यांच्या कामगारांसह प्रात्यक्षिके दाखवून विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. यावेळी विद्यार्थी सुद्धा या औद्योगिक प्रक्रीयेत सहभागी झाले.

या क्षेत्र भेट उपक्रमाला बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ले चे प्राचार्य तथा अर्थशास्त्र विभाग प्रमुख डाॅ. एम. बी. चौगले, संख्याशास्त्र विभाग प्रमुख प्रा. एम. आर. नवत्रे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अर्थशास्त्र विभागाचे डाॅ. जी. पी. धुरी, विभागाचे डाॅ. एस.व्ही.परुळकर उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स