ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयाचे सावंतवाडीत उद्घाटन.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयाचे सावंतवाडीत उद्घाटन.

प्रकाशन: 03 Dec 2024 06:09 PM
वाचन संख्या 44

ब्यूरो न्यूज : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५९ वे वार्षिक अधिवेशन सावंतवाडीत होत आहे. या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण व माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना रविंद्र चव्हाण म्हणाले, अखंड भारताचे स्वप्न पुढे न्यायचे असेल तर तरुणांनी विद्यार्थी दशेतच प्रामाणिकपणे काम केले पाहिजे, असे आवाहन केले. दरम्यान सिंधुदुर्गात प्रथमच होणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनाच्या माध्यमातून कोकणातील प्रश्नांवर विचार मंथन होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी रविंद्र चव्हाण पुढे म्हणाले, या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राष्ट्र भक्ती शिकवली जात आहे. तरुणाईंना आपल्या इतिहासाचा विसर पडू नये यासाठी काम सुरू आहे. या कार्यात युवाई मोठ्या प्रमाणात सहभागी हो आहे. ही कौतुकाची गोष्ट आहे. सावंतवाडीत अधिवेशन निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात राष्ट्रप्रेम आणि कोकणचा विकास या विषयावर विचार मंथन व्हावे.

यावेळी आ. दीपक केसरकर यांनी शुभेच्छा देताना म्हणाले की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्र प्रेमाची भावना जागृत केली जाते. त्याचा फायदा भविष्यातील पिढी बळकट करण्यासाठी होणार आहे. त्या ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या अधिवेशनात कोकणातील विषयावर चर्चा व्हावी. महायुती शासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याासाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेतला आणि यापुढे ही घेवू. ते पुढे म्हणाले, सावंतवाडी होणाऱ्या अधिवेशनात एक हजारहून परिषदेचे कार्यकर्ते सहभागी होणार आहे. त्यामुळे येथील संस्कृती त्यांच्या माध्यमातून देशभरात पोहोचणार आहे. या ठिकाणी सुरू केलेल्या चळवळीत अनेक विद्यार्थी स्वतः पुढे येत आहेत. ही कौतुकाची गोष्ट आहे. येणाऱ्या काळात अधिवेशन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करू.या प्रसंगी संघटनमंत्री नीरज चौधरकर स्वागत समिती अध्यक्ष अतुल काळसेकर, सावंतवाडी शहर अध्यक्ष साईनाथ सितावार, शहर मंत्री स्नेहा धोटे, अधिवेशन व्यवस्था प्रमुख चिन्मती खानोलकर संजू परब, अन्नपुर्णा कोरगावकर अजय गोंदावळे, मनोज नाईक, सुधीर आडिवरेकर अजय सावंत, दिलीप भालेकर दिपाली भालेकर मोहिनी मडगावकर डॉ. प्रविणकुमार ठाकरे, शिवाजी भावसार अवधुत देवधर डॉ. शेखर कार्लेकर, महेश सारंग, बंड्या सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 439

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स