मातृत्व वरदान फाऊंडेशनच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी आयोजित बँकिंग शिबिर उत्साहात.
मातृत्व वरदान अध्यक्ष वैष्णवी मोंडकर तसेच बॅन्क ऑफ बडोदा शाखाधिकारी रोहन पाटील व सिंधुदुर्ग दिव्यांग संस्था अध्यक्ष सत्यम पाटील यांची उपस्थिती.
मालवण | प्रतिनिधी : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून मातृत्ववरदान फाऊंडेशनच्या माध्यमातून सिंधुदुर्ग दिव्यांग संस्था आणि बँक ऑफ बडोदा यांच्या सहकार्याने दिव्यांग बांधवाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शिबीर उत्साहात संपन्न झाले . आज ३ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता हॉटेल श्री महाराज येथे या शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख बँक ऑफ बडोदा शाखाधिकारी रोहन पाटील यांचा मातृत्ववरदान फाऊंडेशनच्या अध्यक्ष वैष्णवी मोंडकर तसेच सिंधुदुर्ग दिव्यांग संस्था अध्यक्ष सत्यम पाटील यांच्या माध्यमातून शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना रोहन पाटील म्हणाले की दिव्यांग बांधवाना अपंगत्व हे जन्मतः किंवा अपघाताने आले असते त्यांच्या व्यावहारिक जीवनात या अपंगत्वामुळे अनेक सामाजिक आर्थिक अडचणींना सामोरं जावे लागत असते. परंतु खचुन न जाता त्यांना आर्थिक सक्षमता प्राप्त होण्यासाठी तसेच आर्थिक स्तर उंचावण्यासाठी बँक आपल्या सोबत असून यात मुद्रा लोन, सिएमजीपी, पीएमजीपी, पर्यटन व्यवसाय वाढीसाठी आई योजना तसेच माध्यमातून शासनाच्या विविध कर्ज योजना यांची त्यांनी माहिती दिली तसेच बँक दिव्यांग बांधवाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सोबत असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन संतोष गंगनाईक यांनी केले यावेळी नंदू देसाई, फॅनी फर्नाडिस (अध्यक्ष माय माउली संस्था( रवींद्र खानविलकर (कार्याध्यक्ष तारकर्ली पर्यटन संस्था ), विष्णू मोंडकर (अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ) यांनी आर्थिक सक्षमीकारणासाठी दिव्यांग बांधवांनी काय करावे याविषयी मार्गदर्शन केले. मातृत्ववरदान फाऊंडेशन तर्फे आयोजित आर्थिक सक्षमीकरण कार्यक्रमाचा ५३ गरजू दिव्यांग व्यक्तींनी लाभ घेतला असून येणाऱ्या काळात दिव्यांग बांधवांना व्यवसाय उभा करण्यासाठी येणाऱ्या अडचणी, प्रकल्प अहवाल कागद पत्र जमा करण्यासाठी तसेच दिव्यांग बांधवाच्या अडीअडचणी मध्ये मातृत्ववरदान फाऊंडेशन तर्फे पुढील काळातही मदत केली जाणार असून आपल्या राहत्या भागात विविध व्यवसायांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमता प्राप्त करण्यासाठी दिव्यांग बांधवाना मदत केली जाणार असल्याचे वैष्णवी मोंडकर अध्यक्ष मातृत्ववरदान फाऊंडेशन यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नंदू देसाई यांनी केले तर सिंधुदुर्ग दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष सत्यम पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी दत्ता कामतेकर,मंगेश करलकर, प्रियांका मांजरेकर, संजय नार्वेकर संस्था प्रतिनिधी आणि अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते.
दिव्यांग बांधवांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मातृत्व वरदानचया माध्यमातून आयोजीत या बॅकिंग शिबिराबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)