ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
ओझर विद्यामंदिरध्ये संविधान दिन उत्साहात.

ओझर विद्यामंदिरध्ये संविधान दिन उत्साहात.

प्रकाशन: 29 Nov 2024 03:57 PM
वाचन संख्या 164

प्राध्यापक पवन बांदेकर यांचे मार्गदर्शन.

मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संविधान दिनाच्या निमित्ताने दिवसभर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यामध्ये सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. प्रशालेचे साहाय्यक शिक्षक पांडुरंग राणे यांनी हस्तलिखित केलेली संविधानाच्या उद्देशिकेची प्रत शाळेच्या दर्शनी भागात लावण्यात आली.

संविधान दिनाच्या निमित्त प्रशालेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. भारत एक लोकशाही गणराज्य, भारतीय संविधान निर्मितीचे टप्पे, भारतीय संविधान-एक जीवनपद्धती, आपले हक्क आणि कर्तव्ये, माझे संविधान माझा अभिमान इत्यादी विषयांवर निबंध लेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला

दुपारच्या सत्रामध्ये ‘भारतीय संविधान’ या विषयावर भंडारी जुनियर कॉलेज मालवणचे प्राध्यापक पवन बांदेकर त्यांचे व्याख्यान झाले. ‘भारतीय संविधाने समतेचे प्रतीक असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे आपण सारे भारतीय ऐक्याच्या धाग्याने बांधले गेलो आहोत, असे प्राध्यापक बांदेकर यांनी आपल्या भाषणातून सांगितले. ओझर विद्यामंदिरने संविधान दिनानिमित्त राबविलेल्या उपक्रमाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशालेचे शिक्षक पांडुरंग राणे, शिवराम सावंत, अभय शेर्लेकर यांनी मेहनत घेतली. संविधान दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शालेय समितीचे सदस्य विजय कांबळी, पालक प्रतिनिधी चंद्रशेखर कांबळी, श्रावणी कांबळी, माजी विद्यार्थिनी निष्ठा कांबळी तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षक पांडुरंग राणे यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स