ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
दुचाकीवरून पडून ज्येष्ठ महिला जखमी.

दुचाकीवरून पडून ज्येष्ठ महिला जखमी.

प्रकाशन: 29 Nov 2024 12:59 PM
वाचन संख्या 428

गतीरोधकावर पांढरे पट्टे रंगवण्याची मागणी करुनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने नागरीक संतप्त.

प्रतिनिधी | नितिन गावडे : सावंतवाडी शिरोडा मार्गावरील आजगाव येथील सेंट झेवियर्स हायस्कूल येथे असलेल्या गतिरोधकावर पांढरे पट्टे नसल्याने, शिरोडा बाजारपेठच्या दिशेने जाताना दुचाकीवर मागे बसलेली एक जेष्ठ महिला रस्त्यावर पडून जखमी झाली. संबधित महिला तिच्या पतीसह रेडी येथे जात होती. घटनास्थळी आजगावातील नागरीकांनी धाव घेत पतीसह त्या महीलेला मदत करुन दवाखान्यात नेले. आजगावातील सेंट झेवियर्स हायस्कूल समोर अतिशय वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या त्या गतीरोधकावर पांढरे पट्टे ठळकपणे रंगवण्याची मागणी स्थानिक नागरीकांनी वारंवार करुनही सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने नागरीकांनी संतप्त व्यक्त केला. इथे यापूर्वीही अशा प्रकारचे अपघात वारंवार होऊन वाहनचालक जखमी झाले आहेत.

आतातरी सार्वजनिक बांधकाम विभागाला याची जाग येऊन तातडीने त्या रंग उडालेल्या गतीरोधकावर पांढरे पट्टे रंगवून सूचनाफलक लावण्यात यावा अशी मागणी वाहनधारकांसह नागरीकांनी केली आहे. ही घट्ना आज २९ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स