शेत तळीत मगरीचे दर्शन.
ब्रीजकम बंधार्यातील पाणी सोडल्यानंतर आढळली मगर.
प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील नाणोस – नाणोसकरवाडी येथील शेत तळीत भली मोठी मगर दिसून आली आहे. याठिकाणी अलीकडेच ब्रीजकम बंधाऱ्याचे काम करण्यात आले होते. या बंधाऱ्यातील पाणी सोडल्याने या तळीत मगर निदर्शनास आली आहे. यापूर्वी मळेवाड येथील नदीत मगरीचे वास्तव्य दिसून आले होते. त्यानंतर आता नाणोस येथे मगर दिसून आल्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)