ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्यानंतर श्रीकांत शिंदेंची भावनिक पोस्ट.

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्यानंतर श्रीकांत शिंदेंची भावनिक पोस्ट.

प्रकाशन: 28 Nov 2024 06:54 PM
वाचन संख्या 211

ब्यूरो न्यूज : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा २ डिसेंबर रोजी होण्याची शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपाचा मुख्यमंत्री करण्याचा मार्ग मोकळा झालाय. सरकार स्थापनेच्या तयारीत असतानाच एकनाथ शिंदे यांनी आपला मुलगा श्रीकांत शिंदे यांना नव्यानं स्थापन होणाऱ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त करावे, अशी विनंती केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रि‍पदावरचा दावा सोडल्यानंतर आता खासदार श्रीकांत शिंदेंनी भावनिक पोस्ट लिहिलीय. खासदार श्रीकांत शिंदे लिहितात की, मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा मिळवली. ते स्वतःला ‘सीएम’ म्हणजे ‘कॉमन मॅन’ समजत त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला.

कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्यभावना दिसून येते. आज त्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि माननीय अमित शाहजी यांच्यावर विश्वास ठेवून वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवल्याचंही श्रीकांत शिंदेंनी अधोरेखित केलंय. सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले. त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गोर-गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे. खूप अभिमान वाटतो बाबा, असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी वडिलांबद्दलच्या त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 282

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स