ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
महायुतीला सिंधुदुर्गातील मच्छिमार व किनारपट्टी समुदायाचा पुन्हा एकदा आशीर्वाद : रविकिरण तोरसकर.

महायुतीला सिंधुदुर्गातील मच्छिमार व किनारपट्टी समुदायाचा पुन्हा एकदा आशीर्वाद : रविकिरण तोरसकर.

प्रकाशन: 25 Nov 2024 08:39 PM
वाचन संख्या 59

मत्स्यव्यवसाय, पर्यटन व इतर पूरक व्यवसायासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना राबविण्यास बळकटी मिळणार असल्याची भाजपा मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी व्यक्त केली आशा.

प्रतिनिधी : भाजपा मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे म्हणले आहे की महायुतीचे उमेद्वार आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांना किनारपट्टी भागात तब्बल ९७९४ एवढे मताधिक्य.१०८ पैकी ९१ बुथवर आघाडी मिळाली महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुका मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्रदीपक विजयात सिंधुदुर्गातील मच्छिमार व किनारपट्टी समुदायाने महत्वाचा वाटा उचलला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२१ किमी च्या किनारपट्टीवर देवगड(नगर पंचायत),मालवण,वेंगुर्ला अश्या दोन नगरपालिका असून बत्तीस ग्रामपंचायती आहेत.जिल्ह्यातील किनारपट्टीवर १०८ मतदान केंद्रे(बूथ)असून यापैकी ९१ मतदान केंद्रावर महायुती आघाडीवर आहेत. एकंदर मतदान ५६२०१ एवढे झाले असून महायुती यांना २९,३९४ तर महविकास व अपक्ष यांना २६८०७ मते पडली म्हणजेच किनारपट्टी भागात तब्बल ९७९४(५२.३०%)एवढे मताधिक्य मिळाले. महायुतीच्या या महविजयात सिंधुदुर्ग किनारपट्टीवर वसलेला मच्छीमार तसेच किनारपट्टीवरील इतर समुदाय याचा मोठा वाटा आहे. त्याबद्दल सर्व किनारपट्टीवरील मतदारांचे भाजपा मच्छीमार सेल तर्फे रविकिरण तोरसकर यांनी आभार मानले आहेत.

किनारपट्टी भागाला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते .तिन्ही अनुभवी आणि सक्षम आमदार विधानसभेत निवडून गेल्यामुळे किनारपट्टी भागातील समस्या सोडवण्यात मदत होणार आहे. तसेच केंद्र व राज्यात महायुतीचे डबल इंजिन सरकार असल्यामुळे मत्स्यव्यवसाय, पर्यटन व इतर पूरक व्यवसायासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना राबविण्यास बळकटी मिळेल अशी आम्हाला आशा असल्याचे श्री रविकिरण चिंतामणी तोरसकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स