डाॅ सई लळीत यांची लाईव्ह मुलाखत.
मालवण | प्रतिनिधी : श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था गराजलो रे गराजलो एक चळवळ आयोजित लाईव्ह अंतर्गत कोकणातील प्रेरणादायी व्यक्तीमत्वांच्या मुलाखतींच्या मालिकेत डॉ सई सतीश लळीत ( वैद्यकीय, लेखिका, कवयित्री, समाजसेविका ) यांची मुलाखत आज गुरुवारी २८ नोव्हेंबर रोजी रात्री गराजलो रे गराजलो च्या फेसबुक पेजवर पहाता येणार आहे. कु. बिंदिया मोहिते ही मुलाखत घेणार असून झी मराठी वरील हास्यसम्राट मालिकेतील एकमेव हास्यकलाकार ठरलेल्या डाॅ सई लळीत यांचे विचार ऐकण्यासाठी आज रात्री गराजलो रे गराजलो च्या फेसबुक पेजला सर्वांनी भेट द्यावी असे आवाहन श्री सोमेश्वर कलामंच च्या वतीने श्री सहदेव धर्णे यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)